मनोज शर्मा, प्रतिनिधी लखीमपुर खीरी, 27 मे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील स्वामी श्याम प्रकाश इंटर कॉलेजमध्ये मुलांसोबत झालेल्या फसवणुकीमुळे सुमारे अनेक मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने या मुलांना मार्कशीट देण्यास नकार दिला. आता शाळा व्यवस्थापनाविरोधात एफआयआर दाखल करण्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून देण्यात आली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईलस, असा इशाराही देण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय - ही घटना लखीमपूर खेरी येथील सदर कोतवाली भागातील स्वामी श्याम प्रकाश इंटर कॉलेजशी संबंधित आहे. याठिकाणी इयत्ता 11वीच्या सुमारे डझनभर विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे की, शाळा व्यवस्थापनाने त्यांना 11वीच्या गुणपत्रिका देण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्यांनी याचे कारण विचारले असता मुलांची फी जमा झाली नसल्याचे दिसून आले. जेव्हा मुलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले की, त्यांनी त्यांचे वर्गशिक्षक विनोद अवस्थी यांना पूर्ण फी भरली आहे आणि त्यांच्याकडून त्यांना कोणतीही पावतीदेखील देण्यात आली नाही.
यावर शाळा व्यवस्थापनाने मुलांना विनोद अवस्थीकडील फी परत आणण्यास सांगितले. मुलांनी त्यांचे वर्गशिक्षक विनोद अवस्थी यांच्याशी बोलले असता त्यांना कळले की, शाळा व्यवस्थापनाने विनोद अवस्थी यांना खाजगी शिक्षक म्हणून कामावर घेतले आहे आणि शाळा व्यवस्थापनाने दोन वर्षांपासून त्याचे पगार दिलेले नाहीत, त्याची भरपाई त्याने मुलांच्या फीद्वारे केली आहे. वर्गशिक्षक विनोद अवस्थी आता शाळेच्या व्यवस्थापनाकडे असलेल्या पगारात मुलांना त्यांच्या फीचे व्यवस्थापन करण्यास सांगत आहेत. या प्रकरणाने पेट घेतल्यावर खचून गेलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन व शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले, मात्र, कोणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. अशा स्थितीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा निमंत्रक अमन गुप्ता यांच्यापर्यंत ही बाब पोहोचली असता त्यांनी तातडीने हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रथम शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली. जेव्हा सुनावणी झाली नाही, तेव्हा त्यांनी या प्रकरणी डीआयओएसशी बोलले, त्यावर त्यांना मुलांची मार्कशीट मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. तर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा निमंत्रक अमन गुप्ता यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले. यावेळी सर्व पीडित विद्यार्थीही त्यांच्यासोबत होते. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, येथेही विलंब झाला. त्यावर त्यांनी शनिवारी सकाळपर्यंत या प्रकरणी कारवाई न झाल्यास आणि मुलांना न्याय न मिळाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शेकडो कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.