मुंबई, 1 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशात हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे व त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा देण्याच्या मागणीचा जोर वाढत आहे.
अशावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही योदींवर टीका केली आहे. यावेळी अनिल देशमुख म्हणाले, ‘उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत बसले आहेत. याआधी त्यांनी आपल्या राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि राज्यात सुरू असलेल्या जंगलराजवर कायदेशीर कारवाई करावी’. काल अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करीत योगींनी आता राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली.
हे ही वाचा-'ये देखो आजका हिंदुस्तान' धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया
प्रियांका गांधींचा हल्लाबोल
योगी सरकार पीडित कुटुंबीयांच्या मानवी हक्कांवर गदा आणत असल्याची टीका प्रियांका गांधींनी केली आहे. आज हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले. अशावेळी मोठा जमाव येथे उपस्थित होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते व नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले. हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Yogi Aadityanath