नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणं हा पर्यावरण संवर्धनाचा (environment protection) सर्वोत्तम मार्ग असल्याचं नेहमीच सांगितलं जातं. विशेषतः ज्या गोष्टी डिस्पोजेबल (disposable) नसतात, त्यांचा कचरा (waste) वर्षानुवर्षे पृथ्वीवर पडून राहतो. त्यासाठीच त्याचा पुनर्वापर ही अत्यावश्यक गोष्ट ठरते. अशाच प्रकारे कचऱ्यावर प्रक्रिया करून अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं तयार करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना नुकतेच असे काही पेन (Pen) मिळाले, जे टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आले होते.
टाकाऊ वस्तूंपासून पेनाची निर्मिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टाकाऊ वस्तूंपासून तयार आलेले सुंदर पेन भेट म्हणून देण्यात आले. ही भेट त्यांना दिली दिल्लीतील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अर्जुमन बानो यांनी. ज्या सेटमध्ये बसवून हे पेन सुप्रिया सुळेंना देण्यात आले, तेदेखील टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलं होतं. या अनोख्या गिफ्टमुळे आपल्याला कमालीचा आनंद झाल्याचं सांगत त्यांनी हा फोटो ट्विट केला आहे.
Thank you Arjuman Bano - @NCPSpeaks - Delhi State - Women’s Wing President for the Pens Made from Recycled Waste 👍🏻 pic.twitter.com/u7064821Gw
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2021
पर्यावरण संरक्षणाचा उद्देश
ई-कचरा, प्लास्टिक आणि इतर कचऱ्यावर प्रक्रिया करून हे पेन तयार करण्यात आले आहेत. अशा पेनमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नसून एक नवा उद्योगही भविष्यात उभा राहू शकतो, अशी प्रतिक्रिया अर्जुमन बानो यांनी दिली आहे.
हे वाचा -उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याचा घेतला बदला; लेकानं जन्मदात्याचा केला खेळ खल्लास
जपानचाही आदर्श
यंदा ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या जपानने जगासमोर पर्यावरण रक्षणाचा संदेश ठेवला आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली सर्व पदकं ही ई-वेस्टचा वापर करून तयार करण्यात आली होती. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर कमी होतो आणि पृथ्वीवरील कचऱ्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होते, असं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Pen, Supreme court