जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोट्यवधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा पुन्हा दणका

कोट्यवधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा पुन्हा दणका

कोट्यवधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा पुन्हा दणका

न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी 2017मध्ये मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : कोट्यवधींचं कर्ज बुडवून भारतातून पळालेल्या विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. विजय मल्ल्याची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. आपल्या जुन्या निकालावर न्यायालय ठाम असून पुनर्विचार करण्यास नकार दिल्यानं मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आपल्या मुलांच्या नावावर 4 कोटी अमेरिकन डॉलर्स ट्रान्सफर केले होते. या प्रकरणी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयानं आदेशाचं उल्लंघन केल्यानं मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायालय आपल्या जुन्या निर्णयावर ठाम असून पुनर्विचार करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

जाहिरात

हे वाचा- मोठी बातमी! लडाखमध्ये जवान आणि चिनी सैनिक आमने-सामने, ड्रॅगनचा डाव उधळला न्यायालयाच्या 2017मधील निर्णयावर मल्ल्यानं पुनर्विचार याचिक दाखल केली. न्यायमूर्ती यू.यू. ललित आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने 27 ऑगस्टला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीवर निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका जाहीर केली असून निर्णय दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात