सोनिया मिश्रा, प्रतिनिधी चमोली/जोशीमठ, 13 जुलै : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं अनमोल असतं. असे काही शिक्षक असतात, जे आपल्या कार्यकाळात असे काम करतात, की जेव्हा त्यांची बदली होते, तेव्हा संपूर्ण गावच त्यांच्यासाठी भावूक होते. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. एका शिक्षकाच्या निरोप समारंभामध्ये संपूर्ण गावच भावूक झाले होते. चमोली जिल्ह्याच्या गणईतील शासकीय आंतर महाविद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक रमेश चंद्र आर्य यांची बदली दुसऱ्या विद्यालयात झाली. यावेळी गावातील लोकांनी त्यांना निरोप दिला.
रमेश चंद्र आर्य यांनी 18 वर्षे पर्वत क्षेत्रात आपली सेवा दिली. तसेच त्यांचा निकालही 100 टक्के राहिला. त्यांनी इंग्रजीसारख्या विषयात शिक्षण्याची आवड निर्माण केली तसेच विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजेल, यापद्धतीने शिकवले. यामुळेच त्यांची बदली झाली, त्यावेळी विद्यार्थ्यांसह संपूर्ण गाव भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
चमोली जिल्ह्यातील संजय चौहान सांगतात की, रमेश चंद्र आर्य यांच्यासारख्या शिक्षकांमुळे लोकांना सरकारी विद्यालयांमध्ये विश्वास वाढत आहे. त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिकतेने याठिकाणी काम केले. उत्तराखंडमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभरात शिक्षक बदलीची ही प्रक्रिया होत असते. पण आपल्या कार्यकाळादरम्यान, काही शिक्षक असे असतात जे आपल्या कार्याने सर्वांची मने जिंकतात. विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. जेव्हा अशा शिक्षकाची बदली होते, तेव्हा मात्र, संपूर्ण गाव, विद्यार्थी सर्वच जण भावूक होतात. असाच काहीसा प्रकार याठिकाणी पाहायला मिळाला.