गुजरात, ३१ ऑक्टोबर २०१८- गुजरातमधला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० च्या दरम्यान हे लोकार्पण होईल. सरदार सरोवर धरण परिसरात केवडिया गावात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. पण पुतळ्याचा जो पाया आहे, त्याची उंचीही धरली तर ती जाते २४० मीटरपर्यंत. जगात इतका उंच पुतळा कुठेही नाही. पुतळा आणि आसपासच्या परिसराचा एकूण भूभाग आहे २० हजार चौरस मीटर. याला एकूण खर्च आलाय ३ हजार एक कोटी रुपये. खर्चातला बहुतांश वाटा गुजरात सरकारनं उचलला, तर केंद्र सरकारनंही काही रक्कम देऊ केली. लार्सन अँड टुब्रो या भारतीय कंपनीनं हा पुतळा उभारला आहे. पुतळा उभारणीच्या कामाला ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरूवात झाली होती. तब्बल ५ वर्षांनी आज या पुतळ्याचं काम पूर्ण झालं असून पंतप्रधानांच्या हस्ते लोकापर्ण आहे.
Gujarat: Prime Minister Narendra Modi has reached Kevadiya where he will inaugurate Sardar Vallabhbhai Patel's #StatueOfUnity today. #RashtriyaEktaDiwas. (File pic) pic.twitter.com/wD9aczfBFl
— ANI (@ANI) October 31, 2018
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त नागपूराच्या संविधान चौकात रन फॉर युनिटी ही दौड आयोजित करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सरदार पटेल यांना श्रद्दांजली अर्पण केली. या वेळी नागपूरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार्या धावपटूंचा सत्कार करण्यात आला. शेकडो नागरिक आणि धावपटू या दौड मध्ये सहभाग घेतला.
#Visuals of Sardar Vallabhbhai Patel's #StatueOfUnity that will be inaugurated by the Prime Minister shortly. (Pictures Source- PMO) pic.twitter.com/7bSXlEVSm4
— ANI (@ANI) October 31, 2018
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली, जळगाव आणी नागपूरमध्ये दौडचं आयोजन करण्यात आलं. दिल्लीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह हे या दौडसाठी उपस्थित होते. नागपूराच्या संविधान चौकात रन फॉर युनिटी ही दौड आयोजित करण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिक आणि धावपटूंनी सहभाग घेतला. तर जळगावमध्ये आयोजित मॅरेथॉनमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर,पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. ही एकता दौड 8 किलोमीटर असून पोलीस मुख्यालयापासून सुरू झाली. असा उभारला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळा - पुतळ्याची उंची - 182 मीटर - बेससह उंची - 240 मीटर - जगातला सर्वात उंच पुतळा - खर्च - 3001 कोटी रु. - बहुतांश निधी गुजरात सरकारकडून - 75 हजार घन मीटर काँक्रीटचा वापर - 5,700 टन स्टील - 18,500 रिईन्फोर्स्ड स्टील रॉड्सचा वापर - पुतळ्याला बाहेरून ब्राँझचं कोटिंग - 22,500 टन ब्राँझचा वापर - प्रकल्पाचा एकूण भूभाग - 20 हजार चौ. मीटर - पुतळ्याभोवती 12 चौ. किमीचा कुत्रीम तलाव - ऑक्टोबर 2013 मध्ये बांधकाम सुरू - ऑक्टोबर 2018 मध्ये बांधकाम पूर्ण - कंत्राटदार - लार्सन अँड टुब्रो (L&T)