जाहिरात
मराठी बातम्या / देश / कुनो पार्कमधील आणखी एका चित्त्याचा मृत्यू, एका महिन्यात दुसरी घटना, काय घडलं?

कुनो पार्कमधील आणखी एका चित्त्याचा मृत्यू, एका महिन्यात दुसरी घटना, काय घडलं?

चित्ता

चित्ता

दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (केएनपी) हलवण्यात आलेल्या 12 चित्त्यांपैकी एकाचा रविवारी मृत्यू झाला.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ : पर्यटकांसाठी आता एक बॅडन्यूज आहे. पर्यटकांसाठी भारतात खास आणलेल्या 12 पैकी 2 बिबट्यांना मृत्यू झाला आहे. रविवार आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. एक महिन्यात जवळपास दोन बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (केएनपी) हलवण्यात आलेल्या 12 चित्त्यांपैकी एकाचा रविवारी मृत्यू झाला. वरिष्ठ वनअधिकारी यांनी ही माहिती दिली. मृत चित्ता ‘उदय’चे वय सहा वर्षे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे केएनपीमध्ये सुमारे महिनाभरातील ही दुसरी घटना आहे . यापूर्वी नामिबियातून केएनपीमध्ये आणलेल्या साशा नावाच्या चित्ताचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला होता.

News18लोकमत
News18लोकमत

चित्यांची दुसरी तुकडी भारतात आणताना देशाला 12 चित्यांची भेट मिळाली होती. वायुसेनेच्या विशेष C-17 ग्लोबमास्टर विमानाने या चित्त्यांना ग्वाल्हेर विमानतळावर आणण्यात आले.

चार डोळ्यांवाला मासा कधी पाहलाय का? पण वाचा या नदीत काय घडलं?

तिथून या चित्त्यांना हेलिकॉप्टरने श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत चित्त्यांना बंदिवासात सोडण्यात आले. त्याच वेळी, गेल्या वर्षी पीएम मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियात आणलेल्या आठ चित्ते सोडले.

राज परिवारातील पहिले सदस्य, ज्यांनी राजेशाही पदवीचा केला त्याग अन् झाले IAS अधिकारी

भारतात पुन्हा एकदा चित्ते पाहायला मिळणार याचा आनंद पर्यटकांना होता. मात्र 2 चित्त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अनेकांनी ट्विटरवर चित्त्यांना भारतात आणण्यावरून टिका केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात