मराठी बातम्या /बातम्या /देश /

दारुड्यांनी अर्ध्या रात्री अभिनेत्रीचा केला पाठलाग; गाडी थांबवून गलिच्छ शिवीगाळ

दारुड्यांनी अर्ध्या रात्री अभिनेत्रीचा केला पाठलाग; गाडी थांबवून गलिच्छ शिवीगाळ

राजधानीत रात्रीचा प्रवास अजूनही धोकादायक आहे. महिलांसाठी तर सुरक्षित नाहीच याचा प्रत्यय या घटनेतून आला.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: भारताची राजधानी दिल्लीत एका टीव्ही अभिनेत्रीचा (Tv actress) काही दारुड्यांनी पाठलाग करून तिला शिवीगाळ केल्याची  घटना समोर आली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात या अभिनेत्रीचा असा पाठलाग करून तिचा छळ करण्यात आला आहे. अभिनेत्री घरी पोहोचल्यानंतर संबंधित आरोपींनी गाडीतून खाली उतरून गलिच्छ शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

टीव्ही अभिनेत्री प्राची तेहलान मंगळवारी रात्री आपल्या पतीसोबत घरी येत होती. त्यावेळी काही लोक त्यांच्या मागे लागले. पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अभिनेत्री प्रशांत विहार येथील तिच्या घरी पोहचली तेव्हा आरोपी युवकांनी गाडीच्या बाहेर उतरून अभिनेत्रीला शिवीगाळ केली. मंगळवारी सकाळी या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा सर्व आरोपी दारूच्या नशेत धुंद होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

प्राची यांचे पती रोहित सरोहा यांचा बिझनेस आहे. ते दोघेही आपल्या नातेवाईकांच्या कडून रात्री आपल्या घरी परतत असताना हा प्रकार घडला. राजधानीत एकट्या-दुकट्याने प्रवास कसा सुरक्षित नाही, याचंच प्रत्यंतर या प्रकारातून आलं.

First published:

Tags: Crime news, Delhi, Tv actress