मराठी बातम्या /बातम्या /देश /सैनिक होणं सोपं नाही; भारत-पाक सीमेवरील जवानांनी दाखवलं उष्णतेचं रौद्र रूप, पाहा Video

सैनिक होणं सोपं नाही; भारत-पाक सीमेवरील जवानांनी दाखवलं उष्णतेचं रौद्र रूप, पाहा Video

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर (India-Pak Border) जवानांनी उष्णतेचं रौद्र रूप दाखविण्यासाठी एक प्रयोग केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर (India-Pak Border) जवानांनी उष्णतेचं रौद्र रूप दाखविण्यासाठी एक प्रयोग केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर (India-Pak Border) जवानांनी उष्णतेचं रौद्र रूप दाखविण्यासाठी एक प्रयोग केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

जयपूर, 4 मे : बीकानेरमधील (Bikaner News) भारत-पाकिस्तान बॉर्डरवर (India-Pak Border) जवानांनी उष्णतेचं रौद्र रूप दाखविण्यासाठी एक प्रयोग केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दोन जवान हातात 2-2 कच्चे पापड घेऊन दिसत आहेत. जवानांनी हे पापर 10 मिनिटं वाळूत दाबून ठेवले. अवघ्या 10 मिनिटात कडक उन्हामुळे पापड भाजून निघाले. यानंतर जवानांनी (Video Viral) भाजलेले पापड तोडूनही दाखवले.

व्हिडीओ करण्याचा काय आहे हेतू?

या व्हिडीओमध्ये एक जवान म्हणतो की, ते सर्वसामान्यांना सांगू इच्छितात की, सैनिकांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. देशसेवेसाठी विषम परिस्थितीतही ते तयार असतात. BSF DIG पुष्पेंद्र सिंह यांचं म्हणणं आहे की, येथे नेहमीच इतका कडक उन्हाळा असतो. मात्र आमच्या जवानांना दृढनिश्चय या उष्णतेपेक्षाही कडक आहे.

हे ही वाचा-12वी नंतर NDA Entrance देणार आहात? मग कसं असतं परीक्षेचं पॅटर्न आणि कसा मिळतो प्रवेश? जाणून घ्या

उष्णतेची पातळी...

पश्चिम राजस्थानमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. बीकानेरमध्ये तापमान 47 डिग्री सेल्सिअसहून अधिक झाला आहे. अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या वाळवंटात शहरांच्या तुलनेत खूप जास्त उष्णता पसरते. तेथे तापमान मोजण्याचं कोणतही साधन नाही. मात्र लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे 50 हून जास्त डिग्री असल्यांची शक्यता आहे.

" isDesktop="true" id="698653" >

बीएसएफच्या जवानांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मचानवर कूलर लावला आहे. येथे सहा तास कडक ड्यूटी करणाऱ्या जवानांना काही वेळासाठी आराम करता येतो. हा कूलर प्रत्येक मचानाजवळ लावण्यात आला आहे. येथे पाणी ओतण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जवानांना यामुळे बऱ्याच अंशी दिलासा मिळतो. हे कूलर चालवण्यासाठी सोलर सिस्टम लावण्यात आली आहे.

First published:

Tags: Live video, Pakisatan