सूर्यग्रहणादरम्यान अनेक अंधश्रद्धा किंवा अपशकून होत असल्याचं सांगितलं जातं. मात्र असं कोणताही प्रकार होत नाही.
गर्भवती महिलांनी या काळात ग्रहण पाहू नये किंवा खाऊ नये असं सांगितलं जातं. मात्र त्यांच्यावर या ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही.
ग्रहणानंतर घर शुद्ध करावं अन्न पाणी टाकून द्यावं असं सांगितलं जातं. ग्रहणामध्ये घरं अशुद्ध होत नाही ही संकल्पना चुकीची आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आलं आहे.
ग्रहणाला घाबरून कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही किंवा विशेष होम हवनही करायलाच हवं असं काही नाही.