जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! पाकिस्ताकडून LOCवर मोठ्या प्रमाणात गोळीबार, 6 जवान जखमी

मोठी बातमी! पाकिस्ताकडून LOCवर मोठ्या प्रमाणात गोळीबार, 6 जवान जखमी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तानकडून फेकण्यात आलेला गोळा सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जम्मू काश्मीर, 03 एप्रिल : जगभरात कोरोनाच्या संकटात असतानाही पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुदंरबनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून याचं चौख उत्तर देण्यात आलं आहे. या चकमकीत 6 जवान जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून फेकण्यात आलेला गोळा सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 4 जवान आणि 2 बीएसएफचे जवान जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात