कर्नाटक, 11 जानेवारी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक ( shripad naik) यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Union ministers shripad naik car crashes Death of wife )
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली होती व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्देवाने यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर श्रीपाद नाईक यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. (Union ministers shripad naik car crashes Death of wife ) सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहे.
श्रीपाद नाईक यांच्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उत्तर कन्नडा जिल्ह्याचे प्रमुख श्रीवरम हेबर यांनी सांगितलं. त्यांना गोव्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करुन नाईक यांची काळजी घेण्याची विनंती केली आहे. गरज असेल तर दिल्लीला शिफ्ट करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व व्यवस्था पाहण्याची विनंती केली आहे.
श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं प्रस्थ आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तींयापैकी एक आहेत. गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणूनही त्यांचा ओळखलं जातं. श्रीपाद नाईक यांचे स्वीय सचिव दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याच कळतय. अंकोलाहून यल्लापूर मार्गे गोकर्णला जात होते. होनकुंबी गावाजवळ त्यांची गाडी पलटी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP