Home /News /national /

धक्कादायक! 3 रीच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचलं, त्यानंतर मृत समजून...

धक्कादायक! 3 रीच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचलं, त्यानंतर मृत समजून...

ती मुलगी रात्री दुकानात चॉकलेट घ्यायला गेली होती

    चुरू, 5 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. आजही महिलांकडे, स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात आहे.  बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता कायद्याच्या धाकाबरोबर घरांमध्ये मुलांची जडणघडण करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली. एका प्राध्यापक महिलेला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. तर राजस्थानमधील चुरू येथील एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने बलात्कार केला आहे. तो केवळ बलात्कार करुन थांबला नाही तर त्याने तिला जीवे मारण्यासाठी डोक्यात वीट घातली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला वीट व दगडांनी वेढले. मात्र सुदैवाने यात मुलीचा जीव वाचला आहे. तर ही घटना अशी की सोमवारी रात्री 9 वर्षांची मुलगी दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेली होती. याचवेळी आरोपी तिथे उपस्थित होता. त्याने तिने खोटं खोटं सांगून जवळील एका जुन्या वाड्यात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. तो इथपर्यंत थांबला नाही तर बलात्कार केल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात वीट घातली. ती मेल्याचे समजून वीट व दगड तिच्या अंगावर ठेवून तिला गाडले. काही वेळानंतर मुलीचे आई-वडील तिचा शोध घेत घेत जुन्या वाड्याजवळ पोहोचले. येथे मुलीच्या कण्हण्याचा आवाज आला. मुलीली अशा अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोक्यावर व अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिला तातडीने रुग्णालयात हलविण्य़ात आले. तिच्य़ा अंगावर अनेक ठिकाणी खूणा आढळल्या. शिवाय प्रायव्हेट पार्टमध्य़े जखमा व सूज आल्याचेही दिसले. काही वेळानंतर तिला जाग आली. तिने हा सर्व प्रकार पोलीस व पालकांना सांगितला. त्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपी अकरम काजी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Child rape

    पुढील बातम्या