मुंबई, 08 जानेवारी : 'कोणी हिंदू असेल तर तो स्वाभाविकपणे देशभक्तच असेल', सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शशी थरूर यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. एका वृत्तपत्रात त्यांनी विषयावर एक लेख लिहिला आहे. त्या लेखात महत्मा गांधीजी हिंदू आणि देशभक्त होते तर हिंदू देशभक्त नव्हते असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
महात्मा गांधीजींना हिंदू धर्मातील ज्या तत्वांचा त्यांना अभिमान होता ती संघ परिवारासारखी नव्हती. महात्मा गांधी हिंदू होते, देशभक्तही होते, पण त्यांनी स्वत:ला ‘हिंदू देशभक्त’ म्हणवून घेतले नाही. मुळात सरसंघचालकांचा रोख हा हिंदू धर्माकडे होता. पण प्रत्यक्षात महात्मा गांधीजींनी भारतीय संस्कृतीला अशा मिश्रणाच्या रूपात पाहत होते, जो वेद आणि पुराणांच्या काळापासूनच विविध इतर धर्मीय प्रभावांना स्वीकारत आला. पण हे संघ परिवाराला समजण्यापलीकडे असल्याचा यावेळी आरोपही शशी थरूर यांनी सरसंघचालकांवर केला आहे. तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार शशी थरूर यांनी आक्षेप घेतला असून आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
नेमकं काय म्हणाले होते सरसंघचालक मोहन भागवत
कोणताही हिंदू हा भारतविरोधी असू शकत नाही. तो हिंदू आहे म्हणजे देशभक्त आहे. तो त्याचा मुलभूत स्वभाव आहे. कोणत्याही महापुरुषाला कुणी आपल्या पद्धतीनं बंदिस्त करु शकत नाही. हे पुस्तक सखोल संशोधनावर आधारित आहे. ज्यांचं यापेक्षा वेगळं मत आहे, ते दुसरं पुस्तक लिहू शकतात. माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो, असं गांधीजींची मत होतं. मी धर्माला समजून घेतल्यानंतरच चांगला देशभक्त होईल, आणि लोकांना तसं सांगू शकेल. स्वराज्य समजण्यासाठी स्वधर्म समजणं आवश्यक आहे. हिंदू आहे म्हणजे तो देशभक्त असणार. तो निद्रीस्त असू शकतो, त्याला जागं करायला हवं पण कोणताही हिंदू भारतविरोधी असू शकत नाही. असं गांधीजींनी सांगितल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवतांनी केला होता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rss mohan bhagwat, Shashi tharoor