मुंबई, 31 मे: केंद्रात नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजाराने नव्या सरकारचे स्वागत केले. शुक्रवारी शेअर बाजार सुरु होतात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 110.13 अंकांच्या वाढीसह तो 39 हजार 942.10 अंकावर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 41.45 अंकांनी वाढ होत 11 हजार 987.35 अंकांवर खुला झाला.
काल राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या मोदी सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळात कोणाला कोणते खाते मिळणार यावर चर्चा सुरु झाली आहे. यातच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेअर बाजार खुला होताच त्याने 40 हजारला स्पर्श केला. याआधी 23 मे रोजी शेअर बाजाराने सर्व प्रथम 40 हजारचा टप्पा पार केला होता.
या कंपन्यांचे शेअर तेजीत
मुंबई शेअर बाजारातील एशियन पेंट-2.82 टक्के, कोल इंडिया-2.06 टक्के, टीसीएस-1.73 टक्के, ओएनजीसी-1.39 टक्के आणि एचसीएल टेक- 1.15 टक्क्यांनी वाढले. तर निफ्टीमध्ये एनटीपीसी-2.32, यस बँक-2.34, बजाज फायनान्स- 2.28 टक्के, बीपीसीएल -2.10 टक्के आणि भारती एअरटेलचे शेअर 2.05 टक्क्यांनी वाढले.
VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.