जाहिरात
मराठी बातम्या / देश / लज्जास्पद राजकारण! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर भाजप नेत्याची टिप्पणी

लज्जास्पद राजकारण! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर भाजप नेत्याची टिप्पणी

लज्जास्पद राजकारण! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर भाजप नेत्याची टिप्पणी

Shameful politics of BJP leader: सीपीएम नेता सीताराम येचुरी यांच्या मुलाचे आज निधन झाले. मात्र, यावरुनही भाजप राजकारण करत असल्याचं दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल: सीपीएमचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी (Ashish Yechury) याचे आज (22 एप्रिल 2021) सकाळी कोरोना **(Covid-19)**मुळे निधन झाले. त्याच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आशिष येचुरी याच्या निधनानंतर सर्वजण शोक व्यक्त करत आहेत मात्र, भाजपला मृत्यूवरही राजकारण करत असल्याचं दिसत आहे. भाजपच्या एका नेत्याने आशिष येचुरी याच्या निधनानंतर आक्षेपार्ह ट्विट (BJP leader objectionable tweet) केलं आहे. भाजप नेत्याचं आक्षेपार्ह ट्विट राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे आणि राजकीय नेते किती द्वेष करतात हे भाजप नेत्याच्या ट्विटवरुन दिसत आहे. बिहारमधील भाजपचे उपाध्यक्ष मिथिलेश कुमार तिवारी (BJP leader Mithilesh Kumar Tiwari) यांनी सिताराम येचुरींचा मुलगा आशिष याच्या निधनानंतर आक्षेपार्ह ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये मिथिलेश कुमार तिवारी यांनी म्हटलं, “चीनचं समर्थन करणाऱ्या सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी याचे चायनीज कोरोनामुळे निधन.” करावं लागलं Tweet Delete तिवारी यांनी केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली. ट्विटरवर एका युजरने म्हटलं, लाज वाटली पाहिजे की हे लिहिण्यासाठी कुठली लस घेतली आहे. ट्विटरवर होत असलेल्या टीकेनंतर तिवारी यांना आपले Tweet Delete करावे लागले आहे.s COVID-19: सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष हा 35 वर्षांचा होता. जवळपास दोन आठवडे त्याच्यावर उपचार सुरू होते. परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्याला उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने त्याचे निधन झाले. आशिष व्यतिरिक्त सीताराम येचुरी यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहे. आशिष येचुरी याच्या निधनानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या संकटात एकिकडे नागरिक एकमेकांना आधार देत आहेत आणि शक्य होईल तितकी मदत करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही भाजप नेता राजकारण करण्याची संधी सोडत नाहीये हे दिसून आलं. तिवारी यांनी आपलं ट्विट हटवलं असलं तरी त्याचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात