नवी दिल्ली, 18 जुलै : नेपाळमार्गे भारतात अवैधरित्या आलेल्या पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची यूपी एटीएस चौकशी करत आहे. सीमा ग्रेटर नोएडामध्ये तिचा प्रियकर सचिन मिणासोबत राहत होती. एटीएसच्या तपासादरम्यान सीमा आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय आणखी बळावला आहे. सीमाला फक्त इंग्रजी वाचताच येत नाही, तर ती ज्या पद्धतीने इंग्रजी वाचत होती ते पाहून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. इंग्रजी वाचत असताना सीमाने एकही चूक केली नाही. सीमा स्वत:ला निरक्षर असल्याचं सांगत आहे, पण तरीही तिने चांगल्या पद्धतीने इंग्रजी कसं वाचलं? यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे. सीमा हैदर निरक्षर आहे मग तिने स्वत: पाकिस्तानमध्ये स्वत:ची संपत्ती कशी विकली आणि ती नेपाळमार्गे भारतात कशी आली? असे प्रश्नही एटीएसने विचारले. सीमा हैदर पबजी खेळताना ज्या लोकांच्या संपर्कात आली त्यातले बहुतेक जण दिल्ली एनसीआर भागातले आहेत, असंही तपासात समोर आलं आहे.
आयडी कार्डमुळे संशय वाढला तपास यंत्रणांना सीमा हैदरच्या आयडी कार्डवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. कोणतीही व्यक्ती तिचं ओळखपत्र जन्माच्या वेळी बनवतो पण सीमाने तिचं ओळखपत्र 22 सप्टेंबर 2022 ला बनवलं आहे. सीमाने एवढ्या उशीरा तिचं पाकिस्तानी ओळखपत्र का बनवलं? याचा तपासही एटीएस करणार आहे. याशिवाय सीमाचा पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रांचीही तपासणी होणार आहे.
सीमा आणि 22 वर्षांचा सचिन मिणा यांची ओळख 2019 साली पबजी गेम खेळताना झाली. यानंतर याचवर्षी सीमा तिच्या नवऱ्याला सोडून चार मुलांसह युएईमध्ये पोहोचली. तिकडून तिने नेपाळचं विमान पकडून सीमा सचिनसह बसने भारतात आली. सीमाच्या पहिल्या नवऱ्याने तिच्यावर धोका दिल्याचा आरोप केला आहे. या दोघांचाही प्रेम विवाह झाला होता.