स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास आॅफर आणली आहे. बँक आपल्या ग्राहकांना मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची संधी देत आहे.
एसबीआय बँकेकडून दिलेल्या माहितीनुसार, इंडियन आॅयल काॅर्पोरेशनने आपल्या पेट्रोल पंपावर भीम अॅपने व्यवहार केला तर त्यांना मोफत ५ लिटर पेट्रोल दिले जाईल.
या आॅफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाल कमीत कमी १०० रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार आहे. भीम अॅपद्वारे पैसे दिल्यानंतर त्या व्यवहाराचा क्रमांक तुम्हाला 9222222084 या फोन क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल .
स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी आॅफर लाँच केली आहे. बँक आपल्या ग्राहकांना मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची संधी देत आहे.
त्यानंतर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ५ लिटर पेट्रोल मोफत भरू शकतात. याची माहिती तुम्हाला फोनवर मिळेल. तसंच याची माहिती तुम्हाला एसबीआयच्या वेबसाईटवर मिळू शकते.
कस्टमर केअरशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही या 1800 22 8888 टोल फ्री क्रमांकावर बोलू शकतात. त्या शिवाय तुम्ही help@xtrarewards.com वर मेलही पाठवू शकता.
एसबीआयकडून ही आॅफर २३नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता बंद होईल. एका मोबाईलवरून तुम्ही दोनवेळा या आॅफरचा फायदा घेऊ शकता.