Home /News /national /

सरसंघचालक म्हणतात, प्रणव मुखर्जींच्या निधनाने RSS चं मोठं नुकसान

सरसंघचालक म्हणतात, प्रणव मुखर्जींच्या निधनाने RSS चं मोठं नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत

    नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास फोटो शेअर करीत प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली अर्पण केली. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. प्रणव मुखर्जी हे RSS साठी मार्गदर्शकाप्रमाणे होते. त्यांच्या निधनामुळे संघाचं कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे, अशी भावना संरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. आज त्यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याशिवाय मोदींनी प्रणव मुखर्जींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांच्यासाठी हा फोटो खास असल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pranav mukharji

    पुढील बातम्या