नवी दिल्ली, 15 एप्रिल : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या मुहूर्तावर मेसमध्ये मांसाहार देण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये गोंधळ झाला होता. मात्र, अद्यापही हा गोंधळ शांत झालेला दिसत नाही आहे. जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलीसदेखील याबाबत पूर्णपणे सतर्क झाले आहे. अशा स्थितीत आता हिंदू सेनेच्या (Hindu Sena) वतीने जेएनयूच्या मुख्य गेटवर भगवे झेंडे आणि भगवे जेएनयूच्या पोस्टर्समुळे प्रकरण आणखी चिघळले आहे.
शाळा आणि महविद्यालयात मारामारी आणि गुंडगिरी असेल तर देशाची प्रगती कधीच होणार नाही. मुलं शाळा-कॉलेजात शिकायला जातात आणि या ठिकाणी फक्त शिक्षण व्हायला हवं. शिक्षण असेल तरच देशाची प्रगती होईल, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी दिली.
शिक्षण मंत्रालयाने मागविला अहवाल -
दरम्यान, रामनवमीच्या मुहूर्तावर जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या अशांततेचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मागवला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) अज्ञात सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्याचबरोबर कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला. सध्या कॅम्पसची सुरक्षा जेएनयूचे सुरक्षा कर्मचारी सांभाळत आहेत. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांचे कर्मचारीही परिसराबाहेर तैनात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Delhi Police, Hindu, JNU