मराठी बातम्या /बातम्या /देश /'पंतप्रधानही गेले हॉस्पिटलमध्ये, मग तुम्ही...' कोरोनाची लस घरीच घेतल्याने साध्वी प्रज्ञा अडचणीत

'पंतप्रधानही गेले हॉस्पिटलमध्ये, मग तुम्ही...' कोरोनाची लस घरीच घेतल्याने साध्वी प्रज्ञा अडचणीत

भाजपच्या भोपाळमधील खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pradnya Singh) यांना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस (Covid vaccination) देण्यात आली. या लसीकरणावरून काँग्रेसनं काही सवाल उपस्थित केले आहेत.

भाजपच्या भोपाळमधील खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pradnya Singh) यांना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस (Covid vaccination) देण्यात आली. या लसीकरणावरून काँग्रेसनं काही सवाल उपस्थित केले आहेत.

भाजपच्या भोपाळमधील खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pradnya Singh) यांना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस (Covid vaccination) देण्यात आली. या लसीकरणावरून काँग्रेसनं काही सवाल उपस्थित केले आहेत.

भोपाळ, 14 जुलै : भाजपच्या भोपाळमधील खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pradnya Singh) यांना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस (Covid vaccination) देण्यात आली. या लसीकरणावरून काँग्रेसनं काही सवाल उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळेच त्यांचं लसीकरण घरी जाऊन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर काही दिवसांपूर्वीच फुटबॉल खेळत असल्याचे आणि डान्स करत असल्याचे व्हिडिओ बाहेर आल्यामुळे काँग्रेसनं (Congress) सवाल उपस्थित केले आहेत.

काँग्रेसचे सवाल

साध्वी प्रज्ञा सिंह यांना कर्करोग असून त्यांना चालताही येत नसल्याचं सांगितलं जातं. मात्र आता त्यांची व्हीलचेअर कुठे गेली, असा सवाल काँग्रेसनं केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्या फुटबॉल खेळत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत चांगलाच गाजला होता. त्याचप्रमाणं त्या एका सामुदायिक विवाह सोहळ्यात हजर असताना तिथं त्यांनी ढोलदेखील बडवले. तर एका घरगुती कार्यक्रमात त्या डान्स करत असल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. जर हे सगळं त्या करू शकतात, तर आजारी असल्याचं सांगून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

वेगळा न्याय का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यासारखे अऩेक बडे नेते स्वतः लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत असताना साध्वी प्रज्ञा यांना कुठल्या कायद्यानुसार घरपोच लस देण्यात आली, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. सामान्यांना एक न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय, हा दुजाभाव लोकशाहीत योग्य नसल्याचीही टीका होत आहे.

हे वाचा - बनावट स्वाक्षरीने IAS पोस्टिंग मिळवलं; चार लग्न आणि एका तरुणीला जाळ्यात अडकवलं

चुकीचा पायंडा पडण्याची भीती

व्हीआयपी लोकांना घरी जाऊन लस देण्याची पद्धत आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढवू शकते. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणेचा वेळ आणि ऊर्जादेखील यात खर्च होत असते. त्यामुळे प्रज्ञा सिंगसारख्या नेत्यांनी स्वतः लसीकरण केंद्रात जाऊन जनतेसमोर आदर्श निर्माण करावा, अशी चर्चा विरोधी पक्ष सध्या करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Congress, Corona vaccination, Madhya pradesh, Sadhvi