'दिल्लीतल्या दंगली काँग्रेसने घडवल्या', रामदास आठवले यांचा गंभीर आरोप

'दिल्लीतल्या दंगली काँग्रेसने घडवल्या', रामदास आठवले यांचा गंभीर आरोप

दिल्लीतील वादात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा उडी घेतली आहे.

  • Share this:

ठाणे, दि. 1 मार्च, प्रतिनिधी : दिल्लीमध्ये झालेली दंगल शांत होत असतानाच यावरून आता मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झालं आहे. राजकीय पक्षांचे नेते 'त्या' दंगलींसाठी परस्परांना जबाबदार धरत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रातले विरोधक भाजपवर आरोप करत आहेत तर भाजपचे नेते पोलिसांच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर भाजपावर याच मुद्यावरून घणाघात केला आहे. याच वादात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा उडी घेतली आहे.

काय आहे आठवलेंचा आरोप?

'दिल्लीच्या दंगलीला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसने ठरवून दंगल घडवली आहे. केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही जबाबदार कसे? दिल्लीत सत्तेत असलेला अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेलं सरकार आणि त्यांचा आम आदमी पक्ष तसंच काँग्रेस दिल्लीतल्या दंगलीला जबाबदार आहे,' असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणाची आता चौकशी होईल तेव्हा सत्य समोर येईल असं आठवले म्हणाले.

हेही वाचा : मोदी-शहांवर हल्लाबोल करत शरद पवारांनी मुंबईत भाजपवर केला गंभीर आरोप

राज्यात काय ?

'मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या संदर्भातली भूमिका सोडली तर आमच्या सरकारमध्ये त्यांचं स्वागत आहे,' असं म्हणत रामदास आठवले यांनी राज यांचं स्वागत केलं. पण त्याचवेळी राज ठाकरे यांच्या भाजप आघाडीत येण्या किंवा न येण्याने आम्हाला विशेष फरक पडणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवण्यास संजय राऊत यांची मोठी भूमिका आहे. पण सध्या तिथे त्यांचीच गळचेपी होत असल्याचं माझं निरीक्षण असल्याचं आठवले म्हणाले.

मनपात महायुतीच!

येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महायुतीचाच महापौर होईल, अशी आशा केंद्रीय मंत्र आठवले यांनी व्यक्त केली. आगामी नवी मुंबई महानगरपालिकेतेत रिपाइंला 5 ते 6 जागा सोडाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. पण औरंगाबादचं संभाजी नगर हे नाव बदलू नये, ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

First published: March 2, 2020, 12:03 AM IST

ताज्या बातम्या