जाहिरात
मराठी बातम्या / देश / दुर्दैवी! अंत्यसंस्कारासाठी निघाले अन् घडलं भयंकर, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

दुर्दैवी! अंत्यसंस्कारासाठी निघाले अन् घडलं भयंकर, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

दुर्दैवी! अंत्यसंस्कारासाठी निघाले अन् घडलं भयंकर, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

या घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

मनेर : काळ आणि वेळ कधी कशी येईल याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या लोकांसोबत भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हा प्रवासच शेवटचा असेल अशी कल्पनाही त्यांनी केली नसेल. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंत्यसंस्कारासाठी ट्रॅक्टरमधून निघालेल्या लोकांचा अपघात झाला. नियंत्रण सुटलं आणि ट्रॅकटर दरीतून खाली कोसळला. यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. हे सगळे लोक अंत्यसंस्कारासाठी गंगा घाटावर जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जाहिरात

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दरीत कोसळला. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव प्रमोद कुमार आहे. काही दिवसांपूर्वी मनेर येथे दोन मोठे अपघात झाले होते. मणेर येथील गंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे मणेरच्या खासपूर गावातही आग लागली आहे. या घटनेत तीन घरे जळून खाक झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात