'मी पान खाण्यासाठी थांबल्यावर जितकी गर्दी होते, तितकीच गर्दी मोदींच्या सभेला'

'मी पान खाण्यासाठी थांबल्यावर जितकी गर्दी होते, तितकीच गर्दी मोदींच्या सभेला'

मोदींच्या सभेवर राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी आपल्या हटके शैलीमध्ये निशाणा साधला आहे.

  • Share this:

पाटणा, 3 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात मोदींनी सभा घेत विरोधकांवर टीका केली. मोदींच्या याच सभेवर राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी आपल्या हटके शैलीमध्ये निशाणा साधला आहे.

'नरेंद्र मोदी, नीतीश आणि पासवानजी यांनी अनेक महिने आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून तितकीच गर्दी जमवली आहे, जितकी मी पान खाण्यासाठी एखाद्या दुकानावर थांबल्यावर जमा होते,' असं ट्वीट लालूप्रसाद यांनी केलं आहे.

दरम्यान, बिहारमधील सभेत मोदींनी विरोधकांच्या अनेक टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आपका चौकीदार पुरी तरह से चौकन्ना हैं ,' असा विश्वास देत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा एनडीएला ताकद देण्याची साद जनतेला घातली. या सभेला मोदींसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजीपीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह एनडीएचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते.

मोदींचा 'इंदिरा गांधी' पॅटर्न

गांधी मैदानातील या सभेत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शैली वापरत जनतेला साद घातली. नरेंद्र मोदी म्हणाले की, 'विरोधक म्हणतात मोदींना हटवा. पण मी म्हणतो दहशतवाद हटवा. ते म्हणतात एकत्र येऊन मोदींना घालवा, पण मी म्हणतो चला एकत्र येवून भ्रष्टाचार मिटवू.'

'विरोधक म्हणतात...इंदिरा हटाओ, मी म्हणते गरिबी हटाओ,' असं इंदिरा गांधी आपल्या भाषणात म्हणत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता विरोधकांवर निशाणा साधताना नरेंद्र मोदींनीही इंदिरा गांधींची हीच स्टाईल वापरल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे

First published: March 3, 2019, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading