जाहिरात
मराठी बातम्या / देश / ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

गेल्या 10 दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्या सुजय रुग्णालयात भरती होत्या

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 17 जुलैः हिंदी मालिका ‘निमकी मुखिया’मध्ये इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या रीता भादुडी यांचे मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या 62 वर्षांच्या होत्या. गेल्या 10 दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्या सुजय रुग्णालयात भरती होत्या. अखेर मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेते शशिर शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रिटा भादुरी यांच्या निधनाची वार्ता शेअर केली. शिशिर यांनी फेसबुकवर ही दुःखद वार्ता शेअर करताना ते म्हणाले की, ‘रिटा भादुरी आपल्यात राहिल्या नाहीत. 17 जुलैला दुपारी 12 वाजता अंधेरी पश्चिम, मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आम्हा सर्वांसाठी त्या आईसारख्या होत्या. त्यांची फार आठवण येईल…’ रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत ढासळत होती. तपासामध्ये त्यांना मूभपिंडाचा त्रास असल्याचे निदर्शनासा आले. यामुळे त्यांना दर दोन दिवसांनी डायलिसिससाठी जावे लागायचे. आरोग्याची समस्या असतानाही त्यांनी मालिकेचे चित्रीकरण कधी थांबवले नाही. जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळायचा, त्या सेटवरच आराम करायच्या.

    रिटा यांची कामासाठी असलेली निष्ठा पाहूनच मालिकेच्या निर्मात्यांनी शुटिंग शेड्युलमध्ये त्यांच्या सोयीनुसार बदल केला होता. वृद्धापकाळाने येणाऱ्या आजारांमुळे काम करणं तर सोडू शकत नाही. मला काम करणं आणि सतत व्यग्र राहायला आवडतं. प्रत्येक क्षणाला मी माझ्या ढासळत चाललेल्या तब्येतीचाच विचार करत बसू शकत नाही. यामुळेच मी कामात स्वतःचं मन रमवते. मला समजून घेणारी फार चांगली टीम मिळाली आहे. अशा लोकांसोबत काम करत राहिल्यावर तुम्ही अधिक उत्साही राहता. ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अमानत’, ‘एक नई पहचान’, ‘बायबल की कहानियाँ’ या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर ‘सावन को आने दो’, ‘राजा’, ‘विरासत’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात