मराठी बातम्या /बातम्या /देश /Rising India : रिक्षा चालवून गावातील मुलांसाठी उभारल्या 9 शाळा, अहमद अलींचं अनोख कामं

Rising India : रिक्षा चालवून गावातील मुलांसाठी उभारल्या 9 शाळा, अहमद अलींचं अनोख कामं

'कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों'

'कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों'

'कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Assam, India

नवी दिल्ली, 29 मार्च : करीमजंग जिल्ह्यातील अहमद अली (87) सध्या अनेकांनासाठी प्रेरणा ठरत आहे. केवळ चर्चा करून समाज बदलत नसतो, यासाठी तुमच्या हातून कृत्य होण्याची गरज असते. यासाठी मेहनत आणि दृढनिश्चयाची गरज असते. आर्थिक आव्हानं असताना त्यांनी जिद्द सोडली नाही आणि वंचित मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी आपल्या गावात एका शाळेची सुरुवात करून एक सकारात्मक पायंडा पाडला.

रिक्षा चालवून आलेल्या पैशातून त्यांनी गावात 9 शाळा सुरू केल्या आणि आपल्या समाजातील मुलांना शिक्षेची कवाडं खुली करून दिली. या शाळेत त्यांना स्वस्त शिक्षण मिळतं. त्यामुळे गावातील मुलांना शिक्षण घेता येत आहे. अहमद अली बांगलादेश सीमेजवळील राज्य आसाममधील पाथरकंडीजवळी खिलोरबंद गावात राहतात. अली यांनी 1978 मध्ये आपलं गाव मधुरबंदमध्ये पहिली शाळा सुरू केली. यासाठी त्यांनी आपली काही जमीन विकली आणि जमिनीचा काही भाग शाळेला दान केला. ज्यावर आता शाळा उभारण्यात आली आहे. त्यांनी आपल्या 36 बीघा जमिनीपैकी 32 बीघा जमीन शाळा उभारणीसाठी दान केली. शाळेचं काम हे अहमदचे साठवलेले पैसे, आणि दररोजच्या कमाईतून होते.

Rising India : केळ्याच्या खोडापासून तयार केल्या वस्तू, आज भारताबाहेरही कमवलंय नाव

अहमद अली यांनी 1990 मध्ये हायस्कूलची स्थापना केली होती. त्यांनी सध्या शाळेची स्थापना केली आहे. भविष्यात एखादं कॉलेज सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. स्वत:ची जमीन देण्याशिवाय शाळा नियमित सुरू राहावी याकडे त्याचं नीट लक्ष असतं. शाळा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, मग त्यात पैसे असो वा मनुष्यबळाचा मुद्दा असो त्याचं कटाक्षाने लक्ष असतं. दिवसभर रिक्षा चालवून आलेले पैसे ते शाळा चालवण्यासाठी देतात. अहमद यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे या गावातील मुलांना शिकता येत आहे.

प्रमाणिकपणे आपलं काम करणाऱ्यांच्या कर्तृत्वाला सोन्याची झळाळी मिळतेच. याचं उदाहरण म्हणजे अहमद यांचं News18 Rising India मध्ये नामांकन झालं आहे. ते देखील शैक्षणिक विभागात. आज होणाऱ्या News18 Rising India Summit मध्ये त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात अहमद यांच्या कामाची दखल घेतली होती. यावेळी मोदी म्हणाले होते की, आसाममधील करीमजंग येथील एका रिक्षावाल्याने आपल्या गावातील गरीब मुलांसाठी 9 शाळा सुरू केल्या आहेत. आपल्या देशातील व्यक्ती अशी कामं करून सकारात्मक पायंडा पाडत आहे.

First published:
top videos

    Tags: India, Inspiring story, News18, Positive story