मुंबई, 03 फेब्रुवारी: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचं बजेट सादर केल्यानंतर सोशल मीडियातून या बजेटवर अनेक रिअॅक्शन दिल्या गेल्या. यामध्ये बॉलिवूडचे कलाकारही मागे राहिले नाहीत. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही बजेटनंतर एक भन्नाट ट्विट केलं आहे. त्याच्या ट्वीटची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 'अर्थमंत्री निर्मला सीतारमण कायम बजेट तयार करताना मिलियन नाही तर ट्रिलियनमधील आकड्यांवर चर्चा करत असतील. पण जेव्हा त्या गृहिणी म्हणून घराचं बजेट सांभाळताना काय करत असाव्यात? विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की दारात येणारे विक्रेते किंवा बाहेर खरेदीला गेल्यानंतर त्या बारगेनिंग करतील का? दूध विक्रेत्याला किंवा भाजी विक्रेत्याला आठ आणे कमी करा, दीड रुपया कमी करा हे सांगत असतील का? हे विचित्र आहे पण हेच जीवन आहे.' असं ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बजेटनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच सोबत युझर्सही या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचं हे ट्वीट सध्या युझर्सच्या चर्चेचा विषय बनला आहे.
Just had a thought. Respected Union finance Madame Nirmala Sitharaman whist preparing the Indian annual budget must talk a trillion rupees there a trillion rupees here. Billion would be small denominator. (Continued)
How does she as housewife deal with local vendors or dudhwala at the door. Does she haggle. Aat Anna kam karo sava rupaya aur kam kar. Strange na?This is life!
अभिनेते ऋषी कपूर यांच्या ट्वीटला 1 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 74 हून अधिक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असतात. देशात घडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर ते आपली मतं मांडत असतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. तर यंदाच्या बजेटमध्ये 10 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्याकडे केंद्र सरकारचा अधिक भर असेल असंही म्हटलं आहे. एलआयसी, कर भरणा सनदी, राष्ट्रीय भरती एजन्सी, शेतकरी कर्ज, रेल्वे, शिक्षण यासह अनेक योजनांवर अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकारने शैक्षणिक बजेटसुद्धा 99,300 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. ह्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना गारज दाखवल्याचा आणि हे बजेट गोंधळात टाकणारं असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर केला आहे.