'मी तुमच्यावर बलात्कार करणार नाही कारण...', 26 जानेवारीला येणाऱ्या 'वादग्रस्त' पाहुण्यांना होतोय विरोध

'मी तुमच्यावर बलात्कार करणार नाही कारण...', 26 जानेवारीला येणाऱ्या 'वादग्रस्त' पाहुण्यांना होतोय विरोध

बोल्सोनारो यांनी भर संसदेत विरोधी पक्षातील महिला नेत्यांना उद्देशून म्हटलं होतं की, मी तुमच्यावर बलात्कार करणार नाही काऱण तुम्ही त्या लायकीच्या नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जानेवारी : ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियस बोल्सोनारो सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ते प्रमुख पाहुणे असणार आहेत. गेल्याच वर्षी राष्ट्रपती झालेल्या बोल्सोनारो हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांना ब्राझीलचे डोनाल्ड ट्रम्प असंही म्हटलं जातं. 2018 मध्ये त्यांनी ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 मध्ये बोल्सानारो यांनी पदभार स्वीकारला.

डाव्यांचे सरकार उलथवल्यानंतर बोल्सोनारो सत्तेत आले होते. त्यामुळे त्यांना प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याला विरोध केला जात आहे. त्यांनी महिलांबद्दल तसेच समलैंगिक समुदायाबद्दल केलेल्या वक्तव्यांनी मोठी खळबळ उडाली होती. ब्राझीलच्या संसदेत वादविवादावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेत्या मारिया डो रोजारिओ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, मी तुझ्यावर बलात्कार करणार नाही कारण तु त्या लायकीची नाहीस. या वादग्रस्त विधानानंतरही त्यांनी माफी मागितली नव्हती.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान बोल्सानारो यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला होता. 2017 मध्येही बोल्सोनारो यांनी त्यांच्या अपत्यांबद्दल माहिती देताना मुलीबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले की, माझी पाच मुलं आहेत. त्यातील चार मर्द असून पाचवं अपत्य कमजोरीच्या वेळी जन्माला आलं जी मुलगी आहे.

समलैंगिक लोकांविरोधात बोल्सोनारो यांनी जाहीरपणे मत मांडले होते. 2002 मध्ये ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती फर्नांडो कार्डोसो हे समलैंगिक लोकांच्या अधिकारासाठी लढत असताना त्यात सहभागी होण्यास बोल्सोनारो यांनी नकार दिला होता. ते म्हणाले होते की, मी यासाठी नाही लढणार, जर मला दोन पुरुष किस करताना दिसले तर त्यांना तिथेच चोप देईन.

बोल्सोनारो यांना विरोध होण्यामागे उस हेसुद्धा एक कारण आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या उत्पादनात भारत आणि ब्राझील यांच्यात स्पर्धा असते. ब्राझील नेहमीच वर्ल्ड ट्रे़ड ऑर्गनायझेशनमध्ये भारताविरुद्ध म्हणणं मांडत असते. भारत उस उत्पादक शेतकऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त मदत करतो असा आरोप त्यांच्याकडून होत असतो.

सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार, सरकारनं मान्य केल्या 3 अटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 02:28 PM IST

ताज्या बातम्या