रिलायन्सला टार्गेट करून चुकीचं चित्र उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

रिलायन्सला टार्गेट करून चुकीचं चित्र उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

रिलायन्सच्या नावावर घसा कोरडा करणाऱ्यांना चोख उत्तर मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतले विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

  • Share this:

मुंबई, 4 जानेवारी: शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने कारण नसताना रिलायन्सला लक्ष्य करून देशभर संभ्रम निर्माण करायचं काम विरोधक करत आहेत. रिलायन्सने (Relaince) काढलेल्या परिपत्रकानं त्यांच्या नावावर घसा कोरडा करणाऱ्यांना चोख उत्तर मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतले विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. शेतकरी आंदोलकांना सांगितलं जात आहे, त्याप्रमाणे कंत्राटी शेतीशी आपला संबंध नाही, हे स्पष्ट करणारं परिपत्रक सोमवारी रिलायन्सच्या वतीने जारी करण्यात आलं. त्यानंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रिलायन्सने शेतजमिनी विकत घेण्याचा विषय नाही. तिथे येण्याचाही मानस नाही असं स्पष्ट करत पुरवठादार सुद्धा हमीभावाने खरेदी करतील अशा प्रकारची भूमिका जाहीर केली आहे. त्याबद्दल बोलताना दरेकर म्हणाले, "रिलायन्सला टार्गेट करून विरोधक कृषी विधेयकांबाबत चुकीचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. शेतीविधेयकांच्या संदर्भात रिलायन्सच्या स्पष्टीकरणाने सरकारच्या बाजूने बळकटी मिळेल. शेतकऱ्याच्या मनात संभ्रम करायचा प्रयत्न केला जात आहे त्याला मूठमाती मिळेल. देशातल्या व राज्यातल्या शेतीसाठी आपण कटीबद्ध आहोत. हा विश्वास देशातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न रिलायन्सने केला आहे."

रिलायन्सने परिपत्रक काढून आपला काँट्रॅक्ट फार्मिंगशी संबंध नाही, असं रिलायन्सने स्पष्ट केलं. कोणत्याही कॉर्पोरेट फार्मिंगसाठी कंपनीने जमीन घेतली नाही. शेतीसाठी कधीही जमीन खरेदी करणार नाही आणि RIL शेतकऱ्यांकडून थेट धान्य अथवा शेतमाल खरेदी करत नाही, हेही रिलायन्सच्या वतीने सांगण्यात आलं.

First published: January 4, 2021, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading