नवी दिल्ली, 4 जानेवारी: केंद्र सरकारने (Central Government) काढलेला शाळांमध्ये सूर्यनमस्कार (Surya Namaskara in Schools) आयोजित करण्याच्या आदेशाचं पालन करायला रझा अकादमीनं (Raza Academy) विरोध (Oppose) दर्शवला आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याला नमन करण्याचा प्रकार असून तो इस्लाममध्ये मान्य नसल्याचं रझा अकादमीनं म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा वाद पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
Schools are directed by Govt. to organize Surya Namaskar program between 1st Jan. - 7th Jan. It is a form of Sun Worship and Islam does not allow it.
— Raza Academy (@razaacademyho) January 4, 2022
काय आहे प्रकरण?
केंद्र सरकारच्या वतीनं देशातील सर्व शाळांसाठी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार 1 जानेवारी ते 7 जानेवारी या काळात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार घालून येण्यात यावेत, असं सांगण्यात आलं आहे. मात्र या आदेशाला रझा अकादमीनं तीव्र विरोध दर्शवला आहे.
काय आहे भूमिका?
इस्लाममध्ये केवळ एकच ईश्वर मानला जातो. त्यामुळे इतर कुणालाही वंदन करणं, हे इस्लाममध्ये मान्य नसल्याचं सांगितलं जातं. सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा प्रकार असला तरीही तो सूर्याला नमस्कार करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे इस्लाममध्ये या प्रकाराला मान्यता नसल्याचं रझा अकादमीनं म्हटलं आहे.
सूर्यनमस्कार न घालण्याचं आावाहन
दरम्यान ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं देशातील मुस्लीम विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार न घालण्याच्या सूचना केल्या आहेत. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश असून प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य असल्याचं पर्सनल लॉ बोर्डानं म्हटलं आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे वाचा-गुंतवणूकदारांचे पैसे सहा दिवसात दुप्पट, 'हे' तीन स्टॉक्स तुमच्याकडे आहे का?
दिला राज्यघटनेचा दाखला
राज्यघटनेत सरकारी शाळांमध्ये कुठल्याही विशिष्ट धर्माचं शिक्षण देण्यात येऊ नये, असं म्हटलं असल्याचा दाखला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं दिला आहे. मुस्लीम धर्मात सूर्याची पूजा करणे मान्य नसल्यामुळे सरकारनं आपला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Muslim