‘छोटू’ म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलं असं उत्तर जे ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

‘छोटू’ म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलं असं उत्तर जे ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

रतन टाटा यांची ही पोस्ट साडेचार लाखाहून अधिक लोकांनी पसंत केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : सोशल मीडियाचं जग खूप वेगळं आहे. लोक येथे कशावर काय भाष्य करतील हे सांगू शकत नाही. नुकतीच टाटा ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना एका तरुणीने इन्स्टाग्रामवर (Instagram) ‘छोटू’ म्हटलं आहे. पण मग असं काय झालं की लोकांनी त्या तरुणीला लक्ष्यं केले. अखेरीस रतन टाटा यांनी त्या तरुणीला वाईट म्हणत असलेल्या सर्वांना शांत केलं.

काय लिहिलं होतं रतन टाटांनी

गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर रतन टाटा यांचे 10 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. यावर आनंद व्यक्त करत त्यांनी लोकांना धन्यवाद दिलं आहे. सोबतच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, हे ऑनलाईन कुटुंब अदभूत आहे. याचा विचार मी येथे जॉईन होताना केला नव्हता. यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमच्याकडून मला या प्लॅटफॉर्मवर बरंच काही शिकायला मिळालं.

धन्यवाद देताना लिहिलं ‘छोटू’

रतन टाटा यांची ही पोस्ट साडेचार लाखाहून अधिक लोकांनी पसंत केली आहे. लोक त्यांचे सतत अभिनंदन करीत आहेत. यादरम्यान, एका वापरकर्त्या तरुणीनं लिहिलं, 'अभिनंदन छोटू'. या टिप्पणीनंतर लोकांनी त्या तरुणीची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. काही लोकांना ही टिप्पणी अवमानकारक आणि लज्जास्पद वाटली. यानंतर मात्र स्वत: रतन टाटांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, 'आपल्या सर्वांमध्ये एक लहान मूल आहे. या तरूणीचा आदर केला पाहिजे '. 82 वर्षाच्या रतन टाटांनी ऑक्टोबरच्या 2019 मध्ये इन्स्टाग्राम जॉईन केलं होतं.

First published: February 12, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या