मराठी बातम्या /बातम्या /देश /मित्र तुरुंगात गेला, जामीन मिळवून देण्याचे आमिषाने मित्राच्या पत्नीवर बलात्कार

मित्र तुरुंगात गेला, जामीन मिळवून देण्याचे आमिषाने मित्राच्या पत्नीवर बलात्कार

पीडितेने फिर्याद दिली आहे की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही प्रकरणात तुरुंगात होता.

पीडितेने फिर्याद दिली आहे की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही प्रकरणात तुरुंगात होता.

पीडितेने फिर्याद दिली आहे की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही प्रकरणात तुरुंगात होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

इंदूर, 11 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने आपल्या मित्राच्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. पती तुरुंगात गेल्यानंतर एका विवाहित महिलेवर तिच्या पतीच्या मित्राने बलात्कार केला. या कृत्यासाठी आरोपीच्या दोन मित्रांनीही त्याला मदत केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मध्यप्रदेशच्या इंदूर येथील चंदन नगर ठाणे परिसरातील राजकुमार नगरमध्ये ही घटना घडली. मित्रानेच मित्राच्या पत्नीसोबत बलात्कार केला. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, अजून प्रमुख आरोपीला अटक झालेली नाही. मैत्रीच्या नात्याला बदनाम करणाऱ्या या आरोपी मित्राला अटक करून शिक्षा व्हावी, यासाठी इंदूर पोलीस मुख्य आरोपीच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकुमार नगर येथील आहे. येथे राहणाऱ्या पीडितेने फिर्याद दिली आहे की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही प्रकरणात तुरुंगात होता. पती तुरुंगात गेल्यानंतर पतीचा मित्र सईद महिलेच्या घरी पोहोचला आणि तिच्या खाण्यापिण्याची आणि गरजांची पूर्ण काळजी घेईल, असे आश्वासन दिले. यासोबतच तिने पतीला जामीन मिळवून देण्याचे आमिषही दिले.

असे खोटे आश्वासन देऊन पतीच्या मित्राने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. यावरून त्याने महिलेला धमक्या देण्यास सुरुवात केली. पीडितेचा पती तुरुंगातून सुटल्यानंतर एके दिवशी सईद त्याचे इतर मित्र समीर आणि सत्तार यांच्यासह महिलेच्या घरी पोहोचला. महिलेचा पती उपस्थित नव्हता. आरोपीने पुन्हा तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्या मित्रांनी समीर व सत्तार यांना घराबाहेर उभे करून पाळत ठेवली.

हेही वाचा - पतीला तुरुंगात पाठवून प्रियकरासोबत फरार झाली 5 मुलांची आई; संपूर्ण कांड जाणून व्हाल शॉक

यानंतर पीडितेने तिच्या पतीला संपूर्ण घटनेची माहिती दिल्यावर तिच्या पतीचा मैत्रीवरचा विश्वासच उडाला. यानंतर पीडितेने पतीसह पोलीस ठाणे गाठून आरोपी सईद आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. चंदन नगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Indore, Madhya pradesh, Rape, Rape news