जाहिरात
मराठी बातम्या / देश / Vande Bharat Train : सुरु होणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, PM मोदी 27 तारखेला दाखवणार हिरवा झेंडा

Vande Bharat Train : सुरु होणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, PM मोदी 27 तारखेला दाखवणार हिरवा झेंडा

सुरु होणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, PM मोदी 27 तारखेला दाखवणार हिरवा झेंडा

सुरु होणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, PM मोदी 27 तारखेला दाखवणार हिरवा झेंडा

27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे उदघाटन करणार आहेत. पहिल्या दिवशी या ट्रेनमधून 10 लहान शाळकरी विद्यार्थी प्रवास करतील.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रांची, 24 जून : रांची ते पाटणा या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून होणार आहे. याआधी संबंधित मार्गावरून ट्रेन चालवण्याची तयारी जोरात सुरू असून आता रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रकही अधिकृतपणे जाहीर केले आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 22349 पटना-रांची वंदे भारत ट्रेन पाटणाहून सकाळी 7 वाजता सुटेल आणि दुपारी 1 वाजता रांचीला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 22350 रांची-पटना वंदे भारत ही ट्रेन रांचीपासून 4:15 वाजता सुटेल आणि रात्री 10:05 वाजता पाटण्याला पोहोचेल. आठवड्यातील मंगळवारच्या दिवशी ही ट्रेन दोन्ही बाजूने चालवली जाणार नाही. सिंहाची शिकार केल्याशिवाय प्यायच्या नाही पाणी, राणी दुर्गावतीबद्दल तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या वेळापत्रक : रेल्वेने नव्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले असून ही ट्रेन पाटणा येथून सकाळी 7 वाजता सुटल्यानंतर,  गया येथून सकाळी 8:25 वाजता पोहोचेल, कोडरमा 9:35 वाजता, हजारीबाग 10:33 वाजता, बरकाकाना 11:35 वाजता, बीआयटी मेश्रा 12:20 वाजता आणि रांची येथे दुपारी 1 वाजता पोहोचेल. त्याच वेळी, ट्रेन रांचीहून 4:15 वाजता सुरू होईल आणि बरकाकाना 5:30, हजारीबाग 6:30, कोडरमा 7:23, गया 8:45 मार्गे पटनाला 10:05 वाजता पोहोचेल.

News18लोकमत
News18लोकमत

पहिल्या दिवशी 10 मुले करतील मोफत प्रवास : पहिल्या दिवशी वंदे भारत ट्रेनमध्ये 10 शाळकरी मुलांना पटना ते रांचीपर्यंत मोफत प्रवास करून दिला जाईल. ज्यामध्ये २ शिक्षकही असतील. या मुलांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रांची रेल्वे विभागातर्फे या मुलांची यादी तयार करण्यात आली आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेक आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, जर आपण भाड्याबद्दल बोललो तर, ट्रेनमधील सामान्य चेअर कारमधील एका सीटचे भाडे रु. 890 तर  विशेष वर्गासाठी हे भाडे रु. 1760 इतके आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात