नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress leader) आणि तिरुअनंतपुरमचे लोकसभा खासदार (Thiruvananthapuram Lok Sabha MP) शशी थरूर (Shashi Tharoor) हे आपल्या इंग्रजी आणि अवघड शब्दांच्या वापरामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यातच शशी थरुर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांचे चर्चेत येण्याचं कारण अवघड इंग्रजी नसून स्वत:चे इंग्रजीतील शब्द सुधारणं हे आहे.
थरूर यांनी गुरुवारी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो शेअर केला. या फोटोत मंत्री रामदास आठवले देखील दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. तो फोटो शेअर करत थरूर म्हणाले, दोन तास चाललेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर हा फोटो सर्व काही सांगून जातो.
आठवले यांची प्रतिक्रिया
त्याचवेळी शशी थरुर यांच्या ट्विटला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ज्यावर अनेक यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. त्या ट्विटला उत्तर देताना आठवले यांनी लिहिलं की, प्रिय शशी थरूर जी, ते म्हणतात ना अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणं अपरिहार्य आहे. तुम्ही 'बजेट' लिहावे 'बायजेट' नाही.
Nearly two-hour rely to the Bydget debate. The stunned & incredulous expression on Minister @RamdasAthawale’s face says it all: even the Treasury benches can’t believe FinMin @nsitharaman’s claims about the economy & her Budget! pic.twitter.com/wOGY7TJYg8
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 10, 2022
आपल्या अवघड इंग्रजीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शशी थरुर यांच्या चुकीमुळे यूजर्स देखील मजेदार प्रतिक्रियाही देत आहे. थरूर नेहमी विरोधकांना टार्गेट करण्यासाठी असे शब्द वापरतात, जे समजून घेण्यासाठी केवळ राजकारण्यांनाच डिक्शनरी वापरावी लागत नाही, तर यूजर्संनाही डिक्शनरी वापरावी लागते.
गेल्या वर्षीच त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना 'अॅलोडोक्साफोबिया' (Allodoxaphobia) असा शब्द वापरला होता. या शब्दाचा अर्थ 'विचारांची अनावश्यक भीती' असा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.