नाशिक, 22 जानेवारी : आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक बाबींवर मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी 26 जानेवारीचा प्लानही सांगितला. यावेळी ते म्हणाले की, मला अबुधाबीला होणाऱ्या क्रिकेट मॅचचं आमंत्रण आहे. याशिवाय यंदा मी 26 जानेवारीला दुबईत ध्वजारोहण करणार आहे. त्यामुळे यंदा आठवले भारतात नाही तर दुबईल जाऊन ध्वजारोहण करणार आहेत. यापुढे ते म्हणाले की, मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं ही मागणी आम्ही कायम करीत आलो आहोत. याशिवाय इंदू मिल काम लवकर करावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे MSEB चे आसाम राज्यात जसे प्रकल्प आहेत, तसे महाराष्ट्रात यावे यातून तरुणांना मोठा रोजगार मिळेल - अबुधाबीला होणाऱ्या क्रिकेट मॅचचं मला आमंत्रण आहे. याशिवाय 26 जानेवारीला ध्वजारोहण मी दुबईत करणार आहे. - मराठा समाज आरक्षण मुद्दा कोर्टात - आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण दिलं आहे - तेलंगणा धर्तीवर आरक्षण मराठा समाजाला नको आहे - या समाजाला स्वतंत्र आरक्षण हवंय. त्यांना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका - औरंगाबाद नामांतरला आमचा विरोध नाही. मात्र एअरपोर्टचं नाव बदलायचं असेल तर अजिंठा, एलोरा लेण्यांचं नाव द्यावं यातून पर्यटनाला चालना मिळेल - समुद्रात वाहून जाणारं पाणी रोखून शेतीला देण्याचं नियोजन करावं ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी मागणी केली आहे. याकरिता केंद्र सरकारची मदत करणार - मुंबई सेंट्रलला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं ही मागणी कायम आहे - इंदू मिल काम लवकर करावं ही माझी मुख्यमंत्र्यांना मागणी - शिर्डी-नगर भागातील रस्ते अत्यंत खराब आहेत. स्टेट हायवे,राष्ट्रीय महामार्गात रूपांतर केले तर केंद्राचा निधी मिळेल. यासाठी राज्य सरकारने केंद्राला मागणी करावी - विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत मिळालेल्या जमिनी शिल्लक असतील तर भूमिहीनांना मिळाव्यात. या जमिनीवर अनेक गरजू जोडधंदे करू शकतील
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.