बाबा राम रहीमला होऊ शकतो 7 वर्षांचा तुरुंगवास

बाबा राम रहीमला होऊ शकतो 7 वर्षांचा तुरुंगवास

  • Share this:

25 आॅगस्ट : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. या प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली तर कमीत कमी सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.

सुप्रीम कोर्टाचे वकील पद्मश्री ब्रहमदत्त दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक शोषणाच्या कोणत्याही प्रकरणात आरोपीला कमीत कमी सात वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दोषी ठरलेल्या आरोपीला एवढी शिक्षाच भोगावी लागणार आहे.

तर अॅडव्हेकेट सुरेंद्र सिंह भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा रहीम आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अपील करू शकतात. पण त्यांना जेलमध्ये जावेच लागणार आहे. जेव्हा कधी कुठल्या आरोपीला 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होते तेव्हा त्याला हायकोर्टात जामीन मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...