23 जून : राष्ट्रपतीपदासाठी आज भाजपतर्फे रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षऱ्या केल्यात. विशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारखे भाजपचे जेष्ठ नेतेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे आत्तापासून बऱ्यापैकी बहुमत असल्याने अर्ज भरतानाही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आत्मविश्वास झळकत होता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.