मंदिराचं काम पूर्ण व्हायला 2025 साल उजाडणार असून 67 एकर परिसरात रामाचं भव्य मंदिर साकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंदिराचं प्रवेशद्वार पूर्वेकडे असावं, असं नियोजन होतं. मात्र पूर्वेकडील जमीन कमी असल्यामुळे मंदिर प्रशासनाने जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीसह आता 110 एकर परिसरात मंदिर कॉम्प्लेक्स उभं राहणार असून त्यासाठी 900 ते 1000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे वाचा -श्रीमंत सासूने केला गरीब जावयाचा खून मंदिर परिसरात संग्रहालय अयोध्येतील राममंदिर परिसरात संग्रहालय आणि संशोधन केंद्रदेखील उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय इमारत, गेस्ट हाऊस, संतमहंतांचं निवासस्तान आणि प्रसादगृह यांची उभारणी केली जात आहे. याशिवाय कुबेर महाल, सीता कुंड यासारख्या रचनादेखील साकारल्या जाणार आहेत. भूमीपूजनाची वर्षपूर्ती राममंदिराच्या भूमीपूजनाची वर्षपूर्ती 5 ऑगस्टला होत आहे. त्यानिमित्तानं अयोध्येत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार वेद प्रकाश गुप्ता यांनी दिली आहे. रामाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या कार्याचा आढावा घेता यावा, यासाठी एक व्ह्यू पॉइंटही तयार केला जाणार आहे.अयोध्येच्या राम मंदिराचं काम कसं सुरू आहे? पाहा राममंदिर साइटच्या आतली EXCLUSIVE दृश्य... निर्धारित तारखेच्या आधीच राम मंदिर भक्तांसाठी खुलं व्हायची शक्यता आहे. #Ayodhya #RamMandir pic.twitter.com/RCuJcuwxM7
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.