मराठी बातम्या /बातम्या /देश /पत्नीला माहेरी सोडायला जाताना पतीने मध्येच गाडी थांबवली अन्… बायको मोजतेय शेवटच्या घटका

पत्नीला माहेरी सोडायला जाताना पतीने मध्येच गाडी थांबवली अन्… बायको मोजतेय शेवटच्या घटका

राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील महत्वाच्या शहरात हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील महत्वाच्या शहरात हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील महत्वाच्या शहरात हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Jaipur, India

आशीष कुमार शर्मा (दौसा) 24 मार्च : राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील महत्वाच्या शहरात हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान सध्या दौसा जिल्ह्यातील बैजूपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कोथिन गावाजवळ एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेवर खूनी हल्ला केल्याची घटना समोर आला आहे. कोथीन गावाजवळ महिला रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या महिलेला जयपूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तिची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

बैजूपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता देवी (23) असे महिलेचे नाव आहे. ती धिगरिया कपूर येथील रहिवासी आहे. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून पोलीस विनिताच्या पतीचा शोध घेत आहेत. विनिता देवी यांना बाईकवर बसवून त्यांचे पती सासरी जात होते, असे सांगितले जात आहे. मात्र मध्येच कोठीण गावाजवळ त्याने विनीता यांच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपीने विनिता यांच्यावर चाकूने वार केले. जवळपास 15 हल्ले केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या विवाहितेला ग्रामीण बैजुपाडा येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. माहिती मिळताच बैजूपाडा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. या घटनेत विनिताच्या पतीच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.

बैजूपाडा पोलीस ठाण्याच्या कोठीण गावाजवळ विनीता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान गावाजवळील शेतात काम करणाऱ्या लोकांनी तीला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले. विनिताची प्रकृती चिंताजनक पाहून तिला जयपूरला दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बैजूपाडा पोलिसांनी सांगितले की, विवाहित महिलेवर जयपूर एसएमएस ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

स्टेशन प्रभारी बनवारी लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता यांच्यावर तिच्या पतीने चाकूने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या जयपूर हॉस्पिटलमध्ये विवाहितेवर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Crime news, Local18, Rajsthan