जयपूर : सामूहिक हत्याकांडने देशात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात 6 महिन्यांच्या बाळाचाही बळी गेला आहे. साखर झोपेत असताना 6 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या केली. त्यानंतर त्यांना फरफटत आरोपीनं अंगणात आणलं आणि जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये सामूहिक हत्या झाल्याची घटना समोर आली. संपूर्ण कुटुंब झोपेत असताना आरोपींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याला ओढत अंगणात अंगणात पेटवून दिलं. या घटनेची माहिती मिळताच एसपी ग्रामीण धर्मेंद्र सिंह यादव घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोधपूरच्या ओसियन उपविभागातील चेराई गावात घडली आहे. मंगळवारी रात्री कुटुंब गाढ झोपेत असताना त्याचवेळी काही आरोपींनी घरात घुसून चार जणांची हत्या केली. यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
वैमनस्यातून ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. चौघांचेही मृतदेह घराच्या अंगणात जळालेल्या अवस्थेत आढळले. सकाळी आजूबाजूच्या लोकांनी धूर पाहिल्यानंतर नेमकं काय घडलं पाहायला आले त्यावेळी हा सगळा भयंकर प्रकार समोर आला. ६ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पूर्ण जळून खाक झाला होता. तर बाकीच्यांचे अर्धवट जाळालेल्या अवस्थेत होते. हा घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.