Home /News /national /

महिला सरपंचाची संपत्ती तब्बल 19 कोटींची, आलिशान स्वीमिंग पूल आहे बंगल्यात! तपासाधिकारीही पडले चाट

महिला सरपंचाची संपत्ती तब्बल 19 कोटींची, आलिशान स्वीमिंग पूल आहे बंगल्यात! तपासाधिकारीही पडले चाट

महिला सरपंचाची (women sarpanch corruption case) एक-दोन नव्हे तर तब्बल 19 कोटींची संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. छापा टाकण्यासाठी आलेले लोकायुक्त आणि कर्मचारीही अफाट संपत्ती पाहून आश्चर्यचकित झाले.

    भोपाळ, 01 सप्टेंबर : लोकप्रतिनिधी हे लोकांच्या कामापेक्षा आपली 'माया' वाढवण्यात जास्त मग्न असल्याचे अलिकडे अनेक घटनांमधून समोर आले आहे. अगदी ग्रामीण पातळीपासून सर्वच स्तरांमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. एका महिला सरपंचाची (MP women sarpanch corruption case) एक-दोन नव्हे तर तब्बल 11 कोटींची संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. छापा टाकण्यासाठी आलेले लोकायुक्त आणि कर्मचारीही अफाट संपत्ती पाहून आश्चर्यचकित झाले. ही घटना मध्यप्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील हुजूर तालुक्याच्या बैजनाथ (Baijanath sarpanch) या गावातील आहे. येथे महिला सरपंचावर (women sarpanch) कारवाई करत लोकायुक्तांनी त्यांची 11 कोटींपेक्षा जास्त संपत्ती उघड केली आहे. गावच्या महिला सरपंच सुधा सिंग यांच्याकडे एक आलिशान बंगला, कोट्यवधी किमतीची वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, जमीन, विम्यासह क्रेशर, जेसीबी, चेन माऊंटन यांसारख्या मशीन सापडल्या आहेत. त्यांची अंदाजित किंमत 11 कोटींपेक्षा जास्त आहे. सुधा सिंग यांनी त्यांच्या एक एकर बंगल्यात एक जलतरण तलावही बांधला होता. लोकायुक्त सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. आतापर्यंत 2 डझनहून अधिक जमिनींची रजिस्ट्री, अनेक वाहने, आलिशान बंगले, क्रेझर्स, सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची तक्रार (corruption case) मिळाल्यावर लोकायुक्तांनी न्यायालयाकडून सर्च वॉरंट घेतलं होतं. यामध्ये आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली आहे. अद्याप कार्यवाही सुरू आहे आणि मालमत्ता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे वाचा - महिला मंत्री मुलाखत देत होत्या अन् मुलगा गाजर दाखवत होता, विचित्र घटनेचा VIDEO व्हायरल लोकायुक्तांनी एकाच वेळी बैजनाथ गाव आणि शारदापूरम कॉलनीतील सरपंचाच्या दोन ठिकाणी छापे टाकले. आतापर्यंत 2 घरे, ज्यांच्या किमती 2 कोटी आणि 1.5 कोटी इतक्या आहेत. 2 क्रशर मशीन, 1 मिक्सर मशीन, एक वीट मशीन, 30 मोठी वाहने सापडली आहेत. यामध्ये चेन माउंट, जेसीबी, हायवा, लोडर, ट्रॅक्टर, इनोव्हा, स्कॉर्पियो या वाहनांचा समावेश आहे. सोन्या-चांदीचे दागिने, जीवन विमा पॉलिसी, 36 भूखंड आणि रोख रक्कमही सापडली आहे. त्यांची अंदाजित किंमत 11 कोटींपेक्षा जास्त आहे. हे वाचा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गिफ्ट व्हाउचर देऊन प्रकरण दडपण्याचा संतापजनक प्रकार मिळालेल्या माहितीनुसार, या 30 वाहनांची किंमत देखील 7 ते 8 कोटींच्या दरम्यान आहे. दोन मोठ्या बंगल्यांव्यतिरिक्त सरपंच सुधा सिंग यांच्या घरी 36 भूखंडांशी संबंधित कागदपत्रेही सापडली आहेत. लोकायुक्तांनी मंगळवारी पहाटे मोठा फौजफाटा घेऊन सरपंचांच्या दोन्ही घरी एकाच वेळी छापा टाकला, ज्यात प्रचंड मालमत्ता उघड झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Madhya pradesh, Raid, Sarpanch election, Women

    पुढील बातम्या