मराठी बातम्या /बातम्या /देश /

'येशू खरा देव, इतर..' राहुल यांच्या प्रश्नाला तामिळनाडूच्या पाद्रींनी दिलेल्या उत्तराने नवा वाद

'येशू खरा देव, इतर..' राहुल यांच्या प्रश्नाला तामिळनाडूच्या पाद्रींनी दिलेल्या उत्तराने नवा वाद

अनेक भाजप नेत्यांनी ही क्लिप शेअर केली आहे, ज्यात एक पाद्री येशू कोण होता याबद्दल राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे.

अनेक भाजप नेत्यांनी ही क्लिप शेअर केली आहे, ज्यात एक पाद्री येशू कोण होता याबद्दल राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे.

अनेक भाजप नेत्यांनी ही क्लिप शेअर केली आहे, ज्यात एक पाद्री येशू कोण होता याबद्दल राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

कन्याकुमारी, 10 सप्टेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) मोहिमेवर आधीच काही ना काही कारणावरून टीका केली जात आहे. आता त्यात आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ (Rahul Gandhi Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते जॉर्ज पोनिया (George Ponniah) या धर्मगुरूंसोबत बोलत आहेत. तमिळनाडूमधले हे धर्मगुरू या व्हिडिओमध्ये जीझसला 'एकमेव खरा देव' म्हणताना दिसून येत आहेत. भाजप नेते शहजाद पूनावाला (Shahzad Poonawalla) यांनी हा व्हिडिओ शेअर करून विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

शहजाद यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'भारत तोडो वुइथ भारत तोडो आयकॉन्स' (Bharat Jodo with Bharat Todo Icons) असं म्हटलं आहे. जॉर्ज पोनिया यांना यापूर्वी हिंदुद्वेषाबद्दल अटक करण्यात आली होती. “भारतमातेची अपवित्र माती मला दूषित करू नये, म्हणून मी बूट घालतो” असंही या व्यक्तीने म्हटलं होतं. याच व्यक्तीने आता “जीझस हा इतर शक्ती (आणि देवांप्रमाणे) नसून, खरा देव आहे” असं या व्यक्तीने म्हटलं आहे. 'भारत तोडो म्हणणाऱ्या व्यक्तींसोबत ही भारत जोडो यात्रा आहे का?' असं शहजाद यांनी आपल्या ट्विटमध्ये (Shahzad Poonawalla tweet) म्हटलं आहे.

काय झाली चर्चा?

राहुल आणि जॉर्ज (Rahul Gandhi with Pastor George) यांच्यामध्ये जीझसबद्दल चर्चा झाली. राहुल यांनी जॉर्ज यांना विचारलं, की जीझस हा देव आहे, की देवाचं रूप आहे? राहुल यांच्या या प्रश्नावर बरेच जण उत्तर देत आहेत. यात एक व्यक्ती असंही म्हणत आहे, की जीझस हा देव आणि देवाचा मुलगा दोन्ही आहे. शहजाद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जॉर्ज (George Ponniah on Jesus) यांनी राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, “जीझस हाच खरा देव आहे, जो इतर कोणतीही शक्ती किंवा ऊर्जेप्रमाणे नसून स्वतःला मानवी स्वरूपात उघड करतो.”

वाचा - आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, हायकोर्टात याचिका दाखल

कोण आहेत जॉर्ज?

पाद्री जॉर्ज पोनिया (Pastor George Ponniah) तमिळनाडूत कन्याकुमारी येथे असलेल्या जननायक ख्रिस्तवा पेरावई या एनजीओचे सदस्य आहेत. यापूर्वीही काही वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात त्यांनी केलेल्या एका भाषणामुळे त्यांच्याविरोधात तमिळनाडूत 30 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानंतर भडकवणारी भाषा वापरल्याबद्दल त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती.

काँग्रेसची भूमिका काय

या व्हिडिओवरून भाजपकडून काँग्रेसवर बरेच आरोप केले जात आहेत. यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी उत्तर दिलं आहे. “हा व्हिडिओ बोगस आहे. हा सगळा भाजपचा प्रपोगंडा आहे. आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत. भाजप तोडण्यात व्यग्र आहे, तर काँग्रेस जोडण्यात. भाजपला देशाची विविधता मान्य नाही, तर दुसरीकडे काँग्रेस हे सर्व एकत्र जोडत आहे,” अशी प्रतिक्रिया जयराम यांनी दिली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी बुधवारी (7 सप्टेंबर) कन्याकुमारीमधून 'भारत जोडो' यात्रेचा शुभारंभ केला होता. या यात्रेमध्ये ते संपूर्ण देशभरात, सुमारे 3,570 किलोमीटर पायी फिरणार आहेत. येत्या 150 दिवसांत ते 12 राज्यांत फिरणार आहेत.

First published:

Tags: Rahul gandhi, Young Congress