मराठी बातम्या /बातम्या /देश /राहुल गांधी लग्नासाठी तयार! कशी मुलगी हवी, तेही सांगितलं...

राहुल गांधी लग्नासाठी तयार! कशी मुलगी हवी, तेही सांगितलं...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. एका युट्युब चॅनलशी बोलताना राहुल गांधींना लग्नाबाबत आणि त्यांच्या ड्रीमगर्लबाबत विचारण्यात आलं.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. एका युट्युब चॅनलशी बोलताना राहुल गांधींना लग्नाबाबत आणि त्यांच्या ड्रीमगर्लबाबत विचारण्यात आलं.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. एका युट्युब चॅनलशी बोलताना राहुल गांधींना लग्नाबाबत आणि त्यांच्या ड्रीमगर्लबाबत विचारण्यात आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. एका युट्युब चॅनलशी बोलताना राहुल गांधींना लग्नाबाबत आणि त्यांच्या ड्रीमगर्लबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी याला उत्तर दिलं आहे. मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे जिचे गूण आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्याशी मिळतील, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबतच्या नात्यावरही भाष्य केलं आहे.

'माझी आजी इंदिरा गांधी माझ्या आयुष्यातलं प्रेम होतं. ती माझी दुसरी आई होती,' असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर राहुल गांधींना तुम्हाला इंदिरा गांधींसारखे गूण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे ज्यांचे गुण माझी आई आणि आजीशी जुळतील, असं राहुल गांधी म्हणाले.

मला पप्पू म्हणलं जातं, पण मला याचं वाईट वाटत नाही कारण हा दुष्प्रचाराचा भाग आहे. असं बोलणारे स्वत: त्रासलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांचं नातं नीट चाललेलं नाही. त्यांना मला शिव्या द्यायच्या असतील तर देऊ दे, मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

'मी कोणाचाच तिरस्कार करत नाही. तुम्ही मला शिव्या द्या, तरीही मी तुमचा तिरस्कार करणार नाही,' असं विधान राहुल गांधींनी केलं. या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी गाडी आणि बाईकबद्दलही सांगितलं. माझ्याकडे गाडी नाही, पण माझ्या आईकडे गाडी आहे. मी लंडनमध्ये राहायचो तेव्हा आरएस 20 बाईक चालवायचो, ती माझ्या आयुष्यातलं एक प्रेम होतं, असं सांगताना राहुल गांधी आठवणीत हरवून गेले.

'मला सायकल चालवायला आवडतं. कधी काळी मला लॅम्ब्रेटा (स्कुटर) आवडायची. भारत अजूनही इलेक्ट्रिक वाहनं आणि ड्रोनमध्ये पिछाडीवर आहे, कारण अजूनही भारतात यासाठी गरजेच्या सुविधा मिळत नाहीत,' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

First published:

Tags: Indira gandhi, Rahul gandhi, Sonia gandhi