सोनिया गांधींच्या हेलिकॉप्टर उड्डाणास पायलटचा नकार, हे आहे कारण

सोनिया गांधींच्या हेलिकॉप्टर उड्डाणास पायलटचा नकार, हे आहे कारण

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा अतिशय दारुण पराभव झाला. एकूण 80 जागांपैकी फक्त रायबरेलीची जागा जिंकता आली.

  • Share this:

रायबरेली 12 जून : सोनिया आणि प्रियंका गांधी बुधवारी रायबरेलीच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर सोनिया गांधी पहिल्यांदाच रायबरेलीत आल्या होत्या. त्यांनी मतदारांचे आभारही मानले. त्या जेव्हा पुन्हा दिल्लीकडे निघायला लागल्या तेव्हा हेलिकॉप्टर उड्डणान घेऊ शकत नाही असं पायलटने सांगितलं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे पायलटने जाण्यास नकार दिला.

हेलिकॉप्टर जावू शकत नसल्याने सोनिया आणि प्रियंका गांधी यांना आता भूम मधल्या विश्रामगृहातच मुक्काम करावा लागणार आहे. या दौऱ्यात सोनिया गांधींनी मतदारसंघातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी सर्वच नेत्यांनी तक्रारींचा भडीमार केला.

कुठल्याही प्रक्रियेत आम्हाला विचारात घेण्यात आलं नव्हतं असं त्यांनी सोनियांना स्पष्टपणे सांगितलं. ज्या लोकांनी तिकीट वाटप केलं आणि प्रचाराची रणनीती तयार केली त्यांनाच परावाची कारणं विचारली पाहिजेत असं नेत्यांनी त्यांना सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा अतिशय दारुण पराभव झाला. एकूण 80 जागांपैकी फक्त रायबरेलीची जागा जिंकता आली. पारंपरिक गढ असलेल्या अमेठीतही राहुल गांधींना आपली जागा राखता आली नाही.

काँग्रेसमध्ये दोन अध्यक्ष?

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेस कार्यकारिणीने मात्र त्यांचा राजीनामा फेटाळला. पण तरीही राहुल गांधी राजीनामा देण्याच्या मन: स्थितीत आहेत. नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत ते पदावर राहतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

राहुल गांधी जरी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असले तरी प्रियांका गांधी यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी विचार केला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. सोनिया गांधीही तब्येतीच्या कारणांमुळे आता तेवढ्या सक्रिय नाहीत. त्यामुळेच नवे अध्यक्ष गांधी घराण्यातले नसतील, असा अंदाज आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष असावेत या सूचनेला पक्षाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली आहे. काँग्रेसच्या दोन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक दक्षिण भारतातला असेल तर चांगलं होईल, असा प्रस्ताव आला आहे. कार्यकारी अध्यक्ष अनुसूचित जाती-जमातींमधला असावा, असाही एक प्रस्ताव आहे.

First published: June 12, 2019, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading