मराठी बातम्या /बातम्या /देश /IAS अधिकाऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, ..तोपर्यंत रक्ताने माखलेले हात धुणार नाही, पत्नीचा टाहो

IAS अधिकाऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, ..तोपर्यंत रक्ताने माखलेले हात धुणार नाही, पत्नीचा टाहो

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पंजाबचे IAS ऑफिसर संजय पोपालीच्या (Sanjay Popli) 27 वर्षांच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पंजाबचे IAS ऑफिसर संजय पोपालीच्या (Sanjay Popli) 27 वर्षांच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पंजाबचे IAS ऑफिसर संजय पोपालीच्या (Sanjay Popli) 27 वर्षांच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली, 26 जून : भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पंजाबचे IAS ऑफिसर संजय पोपाली (Sanjay Popli) यांच्या 27 वर्षाच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. संजय पोपलीला शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्या घरातून 12 किलो सोने, 3 किलो चांदी, 4 आयफोन आणि 2 सॅमसंगचे स्मार्ट वॉच जप्त करण्यात आलेत आहेत. दुसरीकडं संजयचा मुलगा कार्तिक पोपलीचा गोळी लागून मृत्यू झाला. 'दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यानं त्याची हत्या केली,' असा आरोप आएएस अधिकारी संजय पोपलीनं केलाय. यावर दक्षता विभागानेही स्पष्टीकरण दिलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊ.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले पंजाबचे वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय पोपली यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कार्तिकची हत्या करण्यात आली आहे. समोर उभ्या असलेल्या मुलावर दक्षता पथकाने गोळी झाडली. मी त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आता माझाही खून करण्यासाठी घेऊन जात आहे. पोपली यांना शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांनी मीडियासमोर ही माहिती दिली.

पोपली यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी दक्षता पथकाचे डीएसपी अजय कुमार यांना जबाबदार धरले. यापूर्वी त्यांच्या पत्नीनेही मुलाच्या हत्येचा आरोप व्हिजिलन्सवर केला होता. मात्र, दक्षता पथकाने हे आरोप फेटाळून लावले असून, त्यांची टीम पोपलीच्या घरुन परतल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.

आईनेही दक्षता पथकाला धरलं जबाबदार

कार्तिकची आई श्री पोपली यांनीही शनिवारी मुलाच्या मृत्यूसाठी दक्षता पथकाला जबाबदार धरलं. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला दक्षता पथकाने घराच्या वरच्या मजल्यावर नेले. तिथे त्याला गोळ्या घातल्या. जोपर्यंत आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांचे गणवेश काढले जात नाहीत, तोपर्यंत मी रक्ताने माखलेले हात धुणार नाही, असे त्या म्हणाल्या.

ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरी छापा; पिशव्यांमध्ये भरलेले करोडो रूपये, मोजण्यासाठी आणावी लागली मशीन

कार्तिकच्या हत्येचा आरोप दक्षता पथकाने फेटाळला

दक्षता पथकाचे डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की त्यांच्या पथकाने छापा टाकला होता. मात्र, कार्तिक पोपलीच्या मृत्यूशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांची टीम परत आल्यावर त्यांना हा प्रकार कळला. ते घराच्या आतही गेले नाहीत. संजय पोपली यांच्या कबुलीवरूनच घराच्या अंगणात बांधलेल्या स्टोररूममधून सोने-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोपलीच्या घरात साडे बारा किलो सोने मिळालं

शनिवारी दक्षता पथकाने संजय पोपली यांच्या घरातून साडे बारा किलो सोने जप्त केले. यामध्ये प्रत्येकी एक किलो वजनाच्या 9 सोन्याच्या विटा, तर प्रत्येकी एक किलो वजनाच्या चांदीच्या 3 विटांचा समावेश आहे. याशिवाय 4 आयफोन, एक सॅमसंग फोन आणि 2 स्मार्ट घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. 7.30 कोटींच्या सीवरेज प्रकल्पासाठी हरियाणातील कर्नालच्या ठेकेदाराकडून 1% कमिशन घेतल्याप्रकरणी पोपलीला दक्षता विभागाने अटक केली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime