जाहिरात
मराठी बातम्या / देश / Bhagwant Maan : मुख्यमंत्र्यांची नाव डगमगली, पूरग्रस्त भागात पाहणी करतानाचा VIDEO VIRAL

Bhagwant Maan : मुख्यमंत्र्यांची नाव डगमगली, पूरग्रस्त भागात पाहणी करतानाचा VIDEO VIRAL

भगवंत मान यांची नाव मधेच डगमगली

भगवंत मान यांची नाव मधेच डगमगली

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाताना क्षमतेपेक्षा जास्त लोक नावेत बसल्यानं वाहत्या पाण्यात नाव पोहोचताच ती डगमगली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

चंदिगढ, 15 जुलै : गेल्या आठवड्याभरापासून दिल्ली, पंजाबमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. दिल्लीत यमुना नदीला महापूर आला आहे. तर पंजाबमध्येही जालंधर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागाचा दौरा करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेले होते. त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार संत बलवीर सिंह सिचेवाल हेसुद्धा होते. नावेतून जात असताना मुख्यमंत्री मान थोडक्यात बचावले. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाताना क्षमतेपेक्षा जास्त लोक नावेत बसल्यानं वाहत्या पाण्यात नाव पोहोचताच ती डगमगली. त्यावेळी खासदार सिचेवाल यांनी नावेवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जगातला सर्वात महागडा आंबा? शेतकऱ्याने ठेवला पहारेकरी, लावले सीसीटीव्ही

जाहिरात

भगंवत मान हे त्यांचे खासदार, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गिद्दडपिंडीतील हायवेवर तयार करण्यात आलेल्या पुलावरही गेले होते. तिथून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. राज्यसभा खासदार संत बलबीर सिंह सिचेवाल यांनी हायवे पुलावरून मुख्यमंत्र्यांना रेल्वेचा पुलही दाखवला ज्याच्या खालचा भराव धुस्सी बंधारा फुटण्यास कारणीभूत ठरला. यामुळे आजूबाजूचा परिसरही पाण्याखाली गेला आहे. भगवंत मान यांनी संकटकाळात काहीच मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. आपत्तीत कोणीही साथ देत नाहीय पण पंजाबचं मन मोठं आहे. पूर्ण जगाला वाचवणारा पंजाब आहे. सर्वांचे पोट भरणारे राज्य आहे. जगात कुठेही संकट आलं तर तिथे रेडक्रॉस पोहोचेल किंवा नाही पण पंजाबी नक्कीच पोहोचतात असं ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Punjab
  • First Published :
जाहिरात
जाहिरात