मराठी बातम्या /बातम्या /देश /पंजाबमध्ये 106 दिवसांमध्ये फिरलं वारं, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 'आप' पराभूत

पंजाबमध्ये 106 दिवसांमध्ये फिरलं वारं, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 'आप' पराभूत

पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं (AAP) ऐतिहासिक विजय मिळवत सरकार स्थापन केले होते. या निवडणूक निकालानंतर 106 दिवसांमध्येच राज्यात वारं फिरलं आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं (AAP) ऐतिहासिक विजय मिळवत सरकार स्थापन केले होते. या निवडणूक निकालानंतर 106 दिवसांमध्येच राज्यात वारं फिरलं आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं (AAP) ऐतिहासिक विजय मिळवत सरकार स्थापन केले होते. या निवडणूक निकालानंतर 106 दिवसांमध्येच राज्यात वारं फिरलं आहे.

मुंबई, 26 जून :  पंजाबमध्ये यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवत सरकार स्थापन केले होते. या निवडणूक निकालानंतर 106 दिवसांमध्येच राज्यात वारं फिरलं आहे. राज्यातील संगरूर लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (Aap) उमेदवाराचा पराभव झालाय. संगरूर हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मतदारसंघ होता.

मान यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दल (अमृतसर) अध्यक्ष सिमरजीत सिंह मान यांनी विजय मिळवलाय. या विजयासह आम आदमी पक्षाचा लोकसभेतील सुपडा साफ झालाय. यापूर्वी भगंवत मान हे लोकसभेत आम आदमी पक्षाचे एकमेव खासदार होते. या पोटनिवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या गुरमेल सिंह यांचा 6245 मतांनी पराभव केलाय. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या गावातही आम आदमी पक्षाला कमी मतं मिळाली.

संगरूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सिमरजीत सिंह मान आणि गुरमेल सिंह यांच्यात चुरशीची लढत झाली. प्रत्येक फेरीनंतर आघाडी बदलत होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या, भाजपा चौथ्या आणि शिरोमणी अकाली दल (बादल)  पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. या तिन्ही पक्षांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंचे गाव आजही अंधारात, केरोसिनच्या दिव्यात जगतात नातेवाईक

कोण आहेत मान?

सिमरजीत सिंह मान हे भारतीय पोलीस दलातील माजी अधिकारी (IPS) आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात त्यांनी 1984 सााली प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिला होता. ते यापूर्वी 1989 आणि 1999 साली तरतारन आणि संगरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्यावर इंदिरा गांधी यांच्या हत्येत सहभागी असल्यापासून ते देशद्रोहापर्यंत अनेक खटले यापूर्वी चालले आहेत. 1984 साली त्यांना भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच वर्ष तुरूंगात होते. 1989 साली खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर तत्कालीन सरकारनं त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले होते.

First published:
top videos

    Tags: AAP, Punjab