Home /News /national /

शहीद पतीचं स्वप्न पूर्ण...लेफ्टनंट ''निकिता कौल धौंडियाल'' भारतीय सैन्यात दाखल

शहीद पतीचं स्वप्न पूर्ण...लेफ्टनंट ''निकिता कौल धौंडियाल'' भारतीय सैन्यात दाखल

विभूती यांच्या पत्नी निकीता (Nikita Dhoundiyal) यांनी आपल्या शहीद पतीचं स्वप्न पूर्ण केलं आहे. निकीता आज भारतीय सैन्यात (Indian Army) दाखल झाल्या आहेत.

    नवी दिल्ली, 29 मे: पुलवामा चकमकीत शहीद विभूती शंकर धौंडियाल (Vibhuti Dhoundiyal) झाले होते. आता विभूती यांच्या पत्नी निकीता (Nikita Dhoundiyal) यांनी आपल्या शहीद पतीचं स्वप्न पूर्ण केलं आहे. निकीता आज भारतीय सैन्यात (Indian Army) दाखल झाल्या आहेत. निकीता यांनी आज लेफ्टनंट निकिता कौल धौंडियाल म्हणून सैन्यात रूजू झाल्या आहेत. पीआरओ उधमपूर, संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर निकीता सैन्यात दाखल होतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. काश्मीरच्या पुलवामामध्ये 8 फेब्रुवारी 2019 ला दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली होती. या चकमकीत मेजर विभूती धौंडियाल शहीद झाले होते. '55 राष्ट्रीय रायफल्स'चा एक भाग होते. 34 वर्षीय शहीद मेजर विभूती यांचा मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. निकिता कौल धौंडियाल या शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी आहेत. 34 वर्षांचे विभूती जेव्हा शहीद झाले. तेव्हा त्याच्या लग्नाला अवघे 9 महिने झाले होते. विभूती आणि निकिता यांचं लग्न 18 एप्रिल 2018 ला झालं होतं. मेजर विभूती यांचं कुटुंब देहरादूनमध्ये स्थायिक आहे. 19 एप्रिलला पहिल्यांदा विभूती पत्नीसोबत डंगवालला असलेल्या आपल्या घरी पोहोचले होते. पतीच्या जाण्यानंतर या वीरपत्नी निकिता यांनी इलाहबादमध्ये वुमन एन्ट्री स्कीमची परीक्षा दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून त्यांनी ट्रेनिंग घेतली. लेफ्टनंट कर्नल विकास नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता 29 मे रोजी पासआऊट होतील. शहीद मेजर विभूती यांना अखेरचा निरोप देताना निकिता यांची बरीच चर्चा झाली होती. तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत त्या विभूती यांच्या पार्थिवाजवळ उभ्या राहून मी खूप भाग्यशाली आहे की मला तुझ्यासारखा पती मिळाला. विभू मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. नेहमीच जिवंत राहशील. आय लव्ह यू विभू... जय हिंद' असं म्हणाल्या होत्या. निकिता या काश्मीर कुटुंबातील आहे. तर विभूतीचे वडील स्वर्गीय ओमप्रकाश धौंडियाल यांना चार मुले आहेत. त्यात तीन मुली आणि धाकटा मुलगा विभूती होते. मेजर यांचे कुटुंबीय मूळचे पौड़ी जिल्ह्यातील बदरो धुंड गावचे आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Indian army, Pulawama attack

    पुढील बातम्या