News18 Lokmat

ब्रिगेडिअरच्या शौर्याला सलाम, दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी सुट्टी रद्द करून अर्ध्या रात्री मैदानात

ब्रिगेडिअर हरदीप सिंह यांनी देशसेवा प्रथम मानत सुट्टी रद्द करून पुन्हा दहशतवाद्यांशी लढण्यासाठी गेले.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 12:15 PM IST

ब्रिगेडिअरच्या शौर्याला सलाम, दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी सुट्टी रद्द करून अर्ध्या रात्री मैदानात

श्रीनगर, 19 फेब्रुवारी : 'दहशतवाद्यांसोबत सोमवारी झालेल्या चकमकीवेळी ब्रिगेडिअर हरदीप सिंह हे आपली सुट्टी रद्द करून कामावर परतले होते,' अशी माहिती सुरक्षा दलाच्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल के.जे.एस.ढिल्लन यांनी दिली आहे.

भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लानंतर सोमवारी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत भारताने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण त्यात आपले चार जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले. यामधील जखमींमध्ये ब्रिगेडिअर हरदीप सिंह यांचाही समावेश आहे.

ब्रिगेडिअर हरदीप सिंह यांनी देशसेवा प्रथम मानत सुट्टी रद्द करून पुन्हा दहशतवाद्यांशी लढण्यासाठी गेले आणि भारताने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कामगिरीबाबत आता त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

वामात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला भारतीय सुरक्षा यंत्रणेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशिद याचाही समावेश असल्याची माहिती आहे.

रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफलचे मेजर डी.एस.डोंडियाल यांच्यासह 4 भारतीय जवान शहीद झाले. अखेर काही वेळापूर्वी एका घरात लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश आलं आहे.

Loading...

8 तासांचं थरारनाट्य

रात्री 1 वाजता : पुलवामातील एका गावात रात्री 1 वाजता दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पहाटेच्या सुमारास जवान शहीद : दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका मेजरसह 4 भारतीय जवान शहीद झाले. सकाळी 10 वाजता : दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जवळपास 9 तास चकमक सुरू होती. पण दहशतवादी एका घरात लपून बसल्याने त्यांना ठार करण्यात जवानांना अपयश येत नव्हतं. अखेर भारतीय जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या घरावर स्फोट घडवून त्यांचा खात्मा केला.

कोण आहे गाजी रशिद ?

28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा आयईडी एक्सपर्ट होता. राशिद आणि त्याचा दोन साथीदारांनी डिसेंबरमध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्ये लपले होते.

जैशने त्याचा कमांडर राशिदला काश्मीरमध्ये हल्ला करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती आता गुप्तचर विभागाने दिली आहे. काश्मीरमध्ये हल्ला करताना स्थानिक युवकाचा वापर केला जावा अशी जैशची योजना होती. गेल्या वर्षभरात दहशतवादाच्या मार्गावर केलेल्या अनेक युवकांना ऑपरेशन ऑलआउटमध्ये ठार मारण्यात आले आहे. यात जैशचा कमांडर मसूद अजहरच्या बहिणीचा मुलगा तल्हा आणि भावाचा मुलगा उस्मान या दोघांचा समावेश आहे. या दोघांना भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्ये ठार मारले होते.


video viral: 'कश्मीर किसी के अब्बा की जागीर नही', ४ वर्षांच्या नवेलीचा पाकला दम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...