मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतीय सुरक्षा दलाने पुलवामा हल्ल्याच्या 3 मास्टरमाईंडला घेरलं, पहाटेपासून चकमक सुरू

भारतीय सुरक्षा दलाने पुलवामा हल्ल्याच्या 3 मास्टरमाईंडला घेरलं, पहाटेपासून चकमक सुरू

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. या दहशतवाद्यांमध्ये पुलवामात भारतीय जवानांच्या ताफ्यावर केल्या गेलेल्या हल्ल्याचे सूत्रधार असल्याची माहिती आहे.

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. या दहशतवाद्यांमध्ये पुलवामात भारतीय जवानांच्या ताफ्यावर केल्या गेलेल्या हल्ल्याचे सूत्रधार असल्याची माहिती आहे.

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. या दहशतवाद्यांमध्ये पुलवामात भारतीय जवानांच्या ताफ्यावर केल्या गेलेल्या हल्ल्याचे सूत्रधार असल्याची माहिती आहे.

श्रीनगर, 18 फेब्रुवारी : दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलाग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत भारताचे एका मेजरसह 4 जवान शहीद झाले आहेत. तर भारतीय सैन्याने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यातील 3 मुख्य सूत्रधारांना घेरल्याची माहिती आहे.

पुलवामातील एका गावामध्ये हे दहशतवादी लपले आहेत. त्यांच्याकडून आधी भारतीय सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर आता सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. या दहशतवाद्यांमध्ये पुलवामात भारतीय जवानांच्या ताफ्यावर केल्या गेलेल्या हल्ल्याचे सूत्रधार असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यावर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असून चकमक सुरू आहे. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

जैश-ए-मोहम्मदचे टॉपचे 3 कमांडरना लष्कराने घेरले आहे. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने या परिसरात शोध मोहीम सुरु केली होती.

कोण आहेत मास्टरमाईंड?

पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड म्हणून गाजी राशिद आणि कामरान या दोघांची नावे समोर येत आहेत. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात पुंछ मार्गे जैश-ए-मोहम्मदचे 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. या दहशतवाद्यांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. काश्मीरमधील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने काही उपकरणे आणि अन्य स्फोटके देखील आणली होती. तर 28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते.

सर्जिकल स्टाईकच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले

केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा सर्जिकल स्टाईक करेल याच्या भीती पोटी पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच एलओसी अर्थात प्रत्यक्ष ताबा रेषाजवळच्या दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड हटवण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांकडून वापरले जाणारे हे लॉन्चपॅड पाक लष्कराच्या कॅंम्पमध्ये ठेवले जाणार आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने हे स्पष्ट केले होते की जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाई करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्यात आले आहेत.

फुटीरतावाद्यांना मोदी सरकारचा दणका

दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने प्रथम पाकिस्तानला आणि आता काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना दणका दिला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधील सर्व फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यात हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोन, हाशिम कुरैशी, शब्बीर शाह शामिल यांचा समावेश आहे.

Pulwama : काश्मीरमधील 'हा' महामार्ग ठरतोय जवानांसाठीचा मृत्यूमार्ग

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा इथं सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर हल्ल्यासंदर्भातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यातील एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जम्मू्-काश्मीरमधील हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा जवानांसाठी धोक्याचा ठरला आहे.

2013पासून ते आतापर्यंत दहशतवाद्यांनी जवानांवर 11 मोठे हल्ले केले आहेत. यात 58 जवान शहीद झाले आहेत. या 11 हल्ल्यांपैकी अधिकतर हल्ले श्रीनगर-दक्षिण काश्मीर महामार्गावर झाले आहेत. त्यात 58 ते 56 जवान शहीद झाले आहेत. 2013मध्ये दहशतवाद्यांनी रोड ओपनिंग पार्टी (ROP)वर हल्ला गेला होता. या हल्ल्यात CRPFचा एक जवान शहीद झाला होता. त्यानंतर पुलवामामध्ये एका ROPवर झालेल्या हल्ल्यात CRPFचा जवान शहीद झाला होता.

Special Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद?

First published:

Tags: Pulwama Encounter, Terror attack